22 November 2024 6:25 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Health First | डोळ्यात रांजणवाडी झाल्यास करा हे काही घरगुती उपाय

home remedies for ranjanwadi

मुंबई २८ एप्रिल : रांजणवाडीला रांजणवाडीच का म्हणायचे हा तसा अवघड प्रश्न आहे. परंतु डोळ्याच्या पापणीवर किंवा पापणीच्या कडेवर आलेली पुळी, फोड किंवा गाठीला रांजणवाडी म्हणतात. हे आपल्या सर्वांना माहीत आहे.

रांजणवाडी का व कशी होते, हे आधुनिक वैद्यकीयशास्त्रामुळे आज आपल्याला स्पष्टपणे समजले आहे. डोळ्यांच्या त्रासामध्ये डोळा येणे,मोतिबिंदू, काचबिंदू, पाझरु,रांजणवाडी असे काही त्रास डोळ्यांना होतात. यापैकी अगदी सगळ्यांनाच कधी तरी डोळ्यांना होणारा त्रास म्हणजे ‘रांजणवाडी’. एखादी पुळी आल्याप्रमाणेच ती दिसते. डोळ्यांच्या वरच्या भागाला एक पुळी येते. त्यामुळे डोळा सतत दुखत राहतो. घरीच त्याची योग्य काळजी घेतली तर ती जाते देखील. म्हणूनच आज डोळ्यांना रांजणवाडी हा होते? आणि त्यावरील घरगुती उपाय कोणते ते आज विस्तृतपणे आज जाणून घेऊया.

रांजणवाडीची कारणे:
■ डोळ्याची अस्वच्छता
■ सतत डोळ्यांना हात लावण्याची किंवा डोळे चोळण्याची सवय
■ असंतुलीत आहार
■ शरीरातील रोगप्रतिकार शक्ती कमी होणे
■ मधुमेह
■ प्रदूषित वातावरण
■ वारंवार राजंणवाडी होणाऱ्या रुग्णांना चष्म्याचा नंबर आला असण्याची शक्यता असते.

रांजणवाडी घरगुती उपाय :
रांजणवाडीचे प्रकार जाणून घेतल्यानंतर आणि त्यामागची कारणे जाणून घेतल्यानंतर राजणवाडीवर तुम्ही घरगुती उपाय षोधत असाल तर तुम्ही हे काही घरगुती उपाय करु शकता.

१. गरम पाण्याचा मसाज
सगळ्यात सोपा आणि पटकन करता येईल असा उपाय म्हणजे डोळ्यांना गरम पाण्याचा शेक देणे. रांजणवाडी आल्यानंतर डोळ्यांना येणाऱ्या पुळीमध्ये पस साचलेला असतो. तो बाहेर येणे फारच गरजेचे असते. ती पुळी योग्य पद्धतीने फुटली. पस बाहेर निघून गेला की खूप बरे वाटते. त्यामुळे एक स्वच्छ कपडा घेऊन तो गरम पाण्यात बुडवा आणि मग तो डोळयांना लावा. डोळ्यांचे ठुसठुसणे कमी होईल. शिवाय जर पुळीला तोंड आले नसेल तर ते देखील येईल त्यामुळे पुळी योग्यवेळी फुटेल.

२. लसणीचा रस
लसूण ही उष्ण असते. तिचा रस थोडासा कापसावर घेऊन रांजणवाडीवर लावला. तर ती पुळी लवकर बरी होण्यास मदत करते. शक्य असेल तर एका स्वच्छ भांड्यात लसणीची पाकळी घेऊन ती कुटून घ्या. त्याचा रस काढून तो स्वच्छ बोटाने डोळ्यांच्या वर लावा. लसणीचा रस लावल्यानंतर थोड चुरचुरल्यासारखे वाटेल. पण तुम्हाला थोड्यावेळाने नक्कीच बरे वाटेल. आठवड्याभरात तुमची ही पुळी फुटून तुमचा डोला पूर्ववत होईल.

३. केस काढणे
केस परतल्यामुळे जसा आपल्याला केसतोडीचा त्रास होतो. अगदी त्याच पद्धतीने पापणीचा केस दुखावला की हा त्रास होण्याची शक्यता असते. रांजणवाडीमध्येही पापणीच्या एका केसाखाली सगळा पू अडकलेला असतो. जर तो पापणीचा केस इतर कोणत्याही केसांना न हलवता काढता आला की, त्या पुळीमधून सगळा पू अगदी सहजपणे बाहेर पडतो. असे करताना तुम्हाला पुळी दाबण्याची मुळीच गरज नसते. तुम्ही अगदी सहजपद्धतीने तुमचा तो केस काढलात की, तुम्हाला रांजणवाडीपासून त्वरीत आराम मिळेल.

४. धण्याचे दाणे
धणे हे देखील रांजणवाडीवर उत्तम काम करतात. धण्याचा पाण्याने जर तुम्ही डोळे अलगद धुतले तर ते एखाद्या मलमाप्रमाणे काम करतात. तुमच्या डोळ्यांमधील घाण आणि रांजणवाडी पुळी कमी करुन त्याला आराम धण्यामुळे मिळते. एका भांड्यात एक चमचा धण्याचे दाणे घेऊन ते चांगले उकळा. पाणी थंड झाले की, एका स्वच्छ कपड्याने डोळ्यांना लावून ठेवा. तुम्हाला नक्कीच आराम मिळेल.

५. हळद
हळद ही अँटीसेप्टिक असून अनेक जखमांवर ती रामबाण असा इलाज आहे. शिवाय नैसर्गिक असल्यामुळे त्याचे दुष्परिणाम होत नाही. हळद भिजवून ती डोळ्यांना लावून ठेवली तरी देखील तुमच्या रांजणवाडीवर आराम मिळतो. हळदीचा लेप तयार करुन डोळ्यांना लावत असाल तर तो काढून टाकताना ही योग्य काळजी घ्या. डोळ्यांना लावलेला हा लेप योग्य पद्धतीने काढणेही गरजेचे असते.

६. बेबी शँम्पू
अस्वच्छता हे रांजणवाडीचे महत्वाचे कारण आहे. जर तुम्हाला डोळ्यांची स्वच्छता या काळात राखायची असेल तर तुम्ही बेबी शँम्पूचा उपयोग करा. त्वचा किंवा केस धुताना याचा वापर केला तर डोळ्यांत कोणतेही हानिकारक केमिकल्स जात नाहीत. शिवाय डोळे स्वच्छ होण्यासही मदत मिळते. त्यामुळे बेबी शँम्पू हा त्यावर एक उत्तम इलाज आहे.

७. कोरफडीचा गर
कोरफडही थंड असते. रांजणवाडीमध्ये डोळे सतत जळजळत असतात. डोळ्यांची आग होते. डोळ्यांमधून पाणी आल्यासारखे होते. अनेकदा ही पुळी इतकी मोठी होते की, डोळे उघडण्यासही अडथळा होते. डोळ्यांचे सतत दुखणे त्रासदायक ठरते. अशावेळी डोळ्यांना थंडावा देण्याचे काम कोरफरडीचा गर करते. अगदी कमीत कमी कोरफड गर लावून थोडा वेळ आराम करा. जळजळ कमी होईल.

८. पेरुची पाने
पेरुची पाने ही देखील रांजणवाडीवर अत्यंत गुणकारी असतात. पेरुचे एक ताजे पान घेऊन ते कुटून रांजणवाडी आलेल्या डोळ्यांना लावावे. पेरुच्या पानांमुळे डोळ्यांना आराम मिळतो. रांजणवाडी बरी होण्यास मदत मिळते. दिवसातून एकदा जरी तुम्ही हा गर लावला तरी देखील तुम्हाला होणारा त्रास कमी होण्यास मदत होईल.

९. बटाट्याचा रस
बटाटा हा अनेक ठिकाणी वापरला जातो. बटाट्यामध्ये असलेला स्टार्ज त्वचेसाठी जसा फायदेशीर असतो. अगदी त्याच पद्धतीने बटाट्याचा रस रांजणवाडीवर काम करतो. रांजणवाडीवर बटाट्याचा रस लावल्यामुळे पुळी सुकण्यास मदत मिळते. शिवाय डोळ्यांचे ठुसठुसणे कमी होते. रांजणावाडीमुळे डोळ्यांवर राहणारे डागही कमी होतात.

News English Summary: Why Ranjanwadi is called Ranjanwadi is such a difficult question. But a lump, blister or lump on the eyelid or on the side of the eyelid is called Ranjanwadi. We all know this.

News English Title: Do home remedies for ranjanwadi news update article

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x