22 November 2024 1:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO
x

Corona Pandemic | लॉकडाउनमध्ये किमान १५ दिवसांची वाढ होण्याचा अंदाज

Maharashtra corona pandemic

मुंबई, २८ एप्रिल | राज्याला मोठ्या प्रमाणावर लस उपलब्ध होणार नाहीत. त्यामुळे 1 पासून राज्यात लसीकरण सुरू होणार नाही, असं राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे येत्या 1 मे रोजी राज्यातील 18 वर्षांवरील व्यक्तींचं लसीकरण होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर राजेश टोपे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. राज्यात सर्वांचं मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र लगेच मोठ्या प्रमाणावर लस मिळणार नसल्याने राज्यात 1 मे रोजी लसीकरण करण्यात येणार नाही.

आरोग्य मंत्री पुढे म्हणाले की, तरुणांना माझं नम्र आवाहन आहे की आपण सगळ्यांना मोफत लसीकरण करतो आहोत. पण आता समजुतदारीने काम घ्यावं लागणार आहे. नोंदणीसाठी कोविन अॅप वापरणं सक्तीचं आहे. त्यामुळे आधी नोंदणी करूनच नोंदणी केंद्रावर जाता येणार आहे. कुणीही थेट केंद्रावर जाऊन लसीची मागणी करू नये. केंद्र सरकारने नोंदणी बंधनकारक केली आहे”, असं यावेळी राजेश टोपे म्हणाले.

दरम्यान, सध्या आपण ३० एप्रिलपर्यंत लॉकडाउन लागू केला आहे. त्यासंदर्भात देखील मंत्रमंडळात चर्चा झाली. आपल्याला कोणत्याही परिस्थितीत लॉकडाउन वाढवावाच लागेल, अशी परिस्थिती राज्यात निर्माण झाली आहे. मंत्रमंडळाने त्यासंदर्भात देखील चर्चा केली आहे. शेवटच्या दिवशी नक्की १५ दिवस वाढवायचे किंवा किती वाढवायचे यावर निर्णय घेतला जाईल. पण लॉकडाउनमध्ये नक्कीच वाढ होणार आहे आणि ती किमान १५ दिवसांची होईल असा माझा अंदाज आहे”, असं राजेश टोपे म्हणाले आहेत.

 

News English Summary: On the last day, a decision will be made on whether to extend exactly 15 days or how much. But the lockdown will definitely increase and I estimate it will be at least 15 days, ”said health minister Rajesh Tope.

News English Title: Maharashtra lockdown may extended by 15 days said health minister Rajesh Tope after cabinet Meeting news updates.

हॅशटॅग्स

#Vaccination(44)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x