Health First | नाचणी आहे आरोग्यास लाभदायक । नक्की वाचा
मुंबई २८ एप्रिल : संपूर्ण जगभरात आहारात पहिला क्रमांक हा तृणधान्यचा लागतो. आता तृणधान्य म्हणजे कोणते तर तांदूळ, गहू आपल्या घरात सर्वात जास्त यांचा उपयोग केला जातो.काही लोक ज्वारीची भाकरी खातात. पण नाचणीची भाकरी खायला तोंड वाकडं करतात. पण नाचणी मधील गुणधर्म ऐकून तुम्हाला ही धक्का बसेल. नाचणीचे दाने हे गडद विटकरी रंगाचे असतात. तांदूळ आणि गहू आणि ज्वारी पेक्षा किती तरी पटीने जास्त नाचणी मध्ये पोषकद्रव्ये असते. तसेच आपल्या शरीरासाठी आवश्यक असणारे कॅल्शिअम आणि फॉस्परस याचे ही प्रमाण भरपूर असते. ज्यामुळे आपली हाडे आणि दात एकदम मजबूत राहतात.
पौष्टिक मुल्याच्या दृष्टीकोनातुन इतर तृणधान्ये आणि नाचणी यांचा अभ्यास केला असता असे दिसून येते की नाचणीमध्ये काही पोषकद्रव्ये आपल्या नेहमी वापरात असणाऱ्या म्हणजेच गहु, तांदुळ, ज्वारी यांच्या पेक्षा जास्त प्रमाणात आहेत. यात खनिजद्रव्ये, तंतुमय पदार्थ आणि काही जीवनसत्वांचा समावेश होतो. नाचणीमध्ये प्रथिने, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ व उर्जा साधारणपणे इतर तृणधान्या इतकीच आहे. नाचणीमध्ये कॅल्शियमचे आणि फॉस्फरसचे प्रमाण भरपूर आहे. ही दोन्ही खनिजद्रव्ये हाडे आणि दातांच्या वाढीसाठी, बळकटीकरणासाठी आणि मजबूती कायम ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत. सध्या आपण सर्वत्र ऐकतो की हाडांसाठी संबधीत तक्रारी जास्त प्रमाणात दिसून येत आहेत. विशेष करुन मध्यमवयीन आणि वयस्क स्त्री पुरुषांमध्ये या तक्रारी उदा. गुडघे दुखी व हाडांचा ठिसुळपणा जास्त प्रमाणात आढळुन येतो. त्याचे एक मुख्य कारण हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक असणाऱ्या खनिजद्रव्यांचा अभाव असणे. हा अभाव दुर करण्यासाठी नाचणीचा आहारातील वापर वाढणे आवश्यक आहे जेणेकरुन हाडांचे आरोग्य राखण्यास मदत होईल. यासाठी आपल्याला नाचणीचा आपल्या दैनंदीन आहारात समावेश करुन आहाराचे पौष्टिकमुल्य वृद्धिंगत करावे लागेल.
नाचणीयुक्त अन्नपदार्थांचा वापर हा लहान मुले आणि गरोदर स्त्रिया यानांही अतिशय लाभदायक ठरेल. कारण अर्भकाच्या वाढीसाठी गरोदर स्त्रीला जास्त प्रमाणात कॅल्शियम घ्यावे लागते. नाचणीच्या सेवनाने तिला तिच्या नित्य जेवणातूनच जास्त प्रमाणात कॅल्शियम आणि फॉस्फरस तसेच इतर पोषक घटक मिळाल्याने अर्भकाची योग्य वाढ होऊन वजन व लांबी वाढण्यास मदत होईल. वाढत्या वयांच्या मुलां-मुलींना सुध्दा या पोषण द्रव्यांची गरज जास्त असते. नाचणीयुक्त आहाराने ही गरज भरुन काढता येते आणि त्यांची वाढ विशेषतः उंची चांगली वाढु शकते. वृध्द व्यक्तीनांही नाचणीचे पदार्थ लाभदायक ठरु शकतात. नाचणीमध्ये तंतुमय पदार्थ भरपूर प्रमाणात आहेत. नाचणीतील तंतुमय पदार्थांचे प्रमाण इतर तृणधान्यांच्या तुलनेत दुप्पटीपेक्षा जास्त आहे. तंतुमय पदार्थ जास्त असल्याकारणाने नाचणीचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे. त्यामुळे नाचणी मधुमेही व्यक्तींसाठी खुप उपयोगी आहे. कारण ग्लायसेमिक इंडेक्स कमी असणारे पदार्थ रक्तातील साखर एकदम वाढु देत नाहीत आणि त्यामुळे रक्तशर्करेवर नियंत्रण राहते.
तंतुमय पदार्थ रक्तातील कोलेस्टेरॉलवर नियंत्रण ठेवण्यासाठी मदत करतात. तंतुमय पदार्थाचे सेवन बध्दकोष्ठता होऊ देत नाही आणि बध्दकोष्ठतेची तक्रार असेल तर ती दूर करण्यास मदत करतात. वजन वाढु न देण्यासाठी आणि वाढलेले वजन कमी करण्यासाठी तंतुमय पदार्थ खूपच उपयोगी आहेत. तंतुमय पदार्थ समृध्द नाचणीचा आहारात समावेश आपल्याला मधुमेह, वाढीव कोलेस्टेरॉल, स्थुलता, बध्दकोष्ठता अशा आरोग्य समस्यांवर नियंत्रणासाठी उपयोगी ठरतो. नाचणीमध्ये पोटॅशिअम व ब वर्गीय जीवनसत्वांचे प्रमाण जास्त आहे पोटॅशिअम हा पेशीद्रव्यातील एक महत्वपूर्ण घटक आहे. तो पेशी निर्मीतीसाठी आणि पर्यायाने स्नायुनिर्मिती साठी तसेच त्यांची कार्यक्षमता टिकवून ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. ब वर्गीय जीवनसत्वे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास पण मदत करतात. नाचणीचा उपयोग आहारात करण्यासाठी नाचणीवरील आवरण काढून टाकावे लागते. अशी आवरण काढलेली नाचणी सबंध, रवा, पीठ अशा स्वरुपात विविध पदार्थ बनविण्यासाठी वापरता येते.
News English Summary: Cereals are the number one food in the world. Now cereals like rice, wheat are the most used in our house. Some people eat sorghum bread. But they do not eat bread. But you will be shocked to hear the properties of ragi. Ragi contains many times more nutrients than rice and wheat and sorghum. It also contains a lot of calcium and phosphorus, which are essential for your body. Which keeps your bones and teeth strong.
News English Title: Ragi is beneficiary to our health news update article
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार