मोदींच्या सत्ताकाळात कोरोनामुळे तुमचा जीव वाचेल त्यालाच 'विकास' समजा - काँग्रेस
नवी दिल्ली, २८ एप्रिल | कोरोनाने गेल्या एक वर्षात दोन लाखांपेक्षा जास्त लोक आपल्यातून हिरावून घेतले. मंगळवारी देशात सर्वाधिक ३,२८५ लोकांचा मृत्यू झाल्यानंतर सरकारी आकडेवारीत २,०१,१६५ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली. तथापि, खरे आकडे यापेक्षाही खूप जास्त आहेत. त्याचबरोबर देशात प्रथमच एका दिवसात २.६२ लाख लोकांनी कोरोनावर मात केली ही दिलासादायक बातमीही आली. आतापर्यंत १.४८ कोटी लोक कोरोनातून बरे झाले आहेत.
दरम्यान, मंगळवारी ३,६२,७५७ नव्या रुग्णांसह एकूण रुग्णांचा आकडा १.७९ कोटींवर गेला. चिंतेची बाब म्हणजे बरे होण्याचा दर घसरून ८२.३% झाला आहे, हा दर याच वर्षी १७ फेब्रुवारीला ९७.३३ टक्के होता. भारतात कोरोनामुळे पहिला मृत्यू गेल्या वर्षी १२ मार्चला झाला होता. महामारीच्या दुसऱ्या लाटेत आकडे रोज नवा विक्रम घडवत आहेत. १० सर्वाधिक प्रभावित राज्यांतच एप्रिलमध्ये मृतांची संख्या ५ पट वाढली आहे. अमेरिका, ब्राझील, मेक्सिकोनंतर आता भारत दोन लाखांपेक्षा जास्त मृत्यू झालेला चौथा देश आहे.
दरम्यान, देशातील इस्पितळं आणि स्मशानभूमीच्या बाहेरील स्थिती अत्यंत भयाण झाल्याचं पाहायला मिळतंय. लोकांपुढे जीव वाचवणं हेच ध्येय असल्याचं अनेक राज्यांमध्ये पाहायला मिळतंय. या परिस्थितीमुळे सर्वत्र गंभीर वातावरण झालं असून त्याचे प्रतिबिंबं इस्पितळाबाहेरील आणि स्मशानभूमीबाहेरील लोकांच्या चेहऱ्यावर स्पष्ट पाहायला मिळतंय. त्यालाच अनुसरून काँग्रेसचे वरिष्ठ नेते सुरेंद्र राजपूत यांनी ट्विट करून मोदी सरकारवर टीका केली आहे. त्यांनी ट्विट करताना म्हटलंय की, “मोदींच्या सत्ताकाळात कोरोनामुळे तुमचा जीव वाचेल त्यालाच ‘विकास’ समजा”.
मोदी राज में #Corona से जान बच जाये उसी को #विकास समझो।
— Surendra Rajput (@ssrajputINC) April 28, 2021
News English Summary: Corona has deprived more than two million people of us in the last one year. The highest death toll in the country was 3,285 on Tuesday, with government figures showing 2,01,165 deaths due to corona. However, the real figures are much higher than this. At the same time, for the first time in the country, 2.62 lakh people overcame Corona in a single day. So far, 1.48 crore people have been cured of corona.
News English Title: Congress leader Surendra Rajput criticized Modi govt over situation created in India after corona pandemic news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार