Health First | नारळाचे पाणी हे आपल्या आरोग्यास अमृतासमान पेय । नक्की वाचा
मुंबई २८ एप्रिल : निसर्गाची करणी आणि नारळात पाणी ‘ यात खरोखरच तथ्य आहे कारण नारळ पाणी आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले आहे. नारळ पाणीमध्ये इलेक्ट्रोलाईट, पोटॅशियम, लोह, मॅंगनीज, व्हिटॅमिन सी आणि फोलेट यासारखे आणखी बरेच पौष्टिक घटक त्यात आढळतात. जरी नारळाच्या पाण्याची चव गोड असली, तरी त्यात नैसर्गिक साखर असते आणि कृत्रिम स्वीटनर अजिबात वापरला जात नाही. त्यामुळे आपल्या शरीराच्या किंवा रक्ताच्या साखर पातळीवर त्याचा काहीही परिणाम होत नाही. गर्भावस्थेमध्ये तर नारळ पाणी सर्वात चांगले मानले जाते.
नारळाच्या पाण्याबद्दल सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे नारळाच्या पाण्यात औषधी गुणधर्म असतो.. आयुर्वेदाच्या मते, नारळाचे पाणी थंड असते. हे पाणी पिल्याने पित्त आणि वातापासून तुम्ही लांब राहू शकता आणि हे पाणी मूत्राशयाची सुद्धा सफाई करतो. एक सालईन आणि एका नारळाचे पाणी समान असतं असं म्हटलं जातं. त्यामुळे नारळाचं पाणी शरीरासाठी अत्यंत आरोग्यदायी असतं.. जाणून घेऊया नारळाच्या पाण्याचे फायदे…
नितळ त्वचेसाठी
नारळाचे पाणी पिण्याने आपली त्वचा नितळ बनण्यास मदत मिळते. पुरळ आणि डागांसारख्या त्वचा समस्यांपासून सुटका मिळवण्यास मदत करते आणि आपली त्वचा चमकदार बनवते. याच्या सेवनाशिवाय नारळाचे पाणी चेहऱ्यावर लावल्याने उत्तम परिणाम मिळू शकतात. हे मॉइश्चर म्हणून कार्य करते आणि एक टोनर म्हणून सम प्रभावी आहे.
गर्भधारणेनंतर फायद्याचे
नारळाच्या पाण्याविषयी एक अतिशय महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे गर्भधारणेनंतर आठवडयातून दोन-तीन वेळा नारळाचे पाणी नियमित प्यायल्यास बाळाची कांती सुधारते आणि बाळाचा रंग उजळतो. शिवाय टॉनिक म्हणूनही ते उपयुक्त आहे.
केसांसाठी उपयुक्त
पावसाळ्यामध्ये केस धुणे म्हणजे एक मोठा प्रश्न असतो. केसासाठी नारळाचे पाणी अतिशय उपयुक्त आहे. केस धुण्यापूर्वी साधारण एक तास आधी नारळाचे पाणी केसांना आणि टाळूला चोळावे. यामुळे केस मुलायम होतातच, शिवाय केसांच्या मुळांचे पोषण होऊन केस गळण्याचे प्रमाण कमी होऊन केसांची वाढ होते.
वजन घटण्यास उपयुक्त
नारळाच्या दुधात अधिक प्रमाणात फॅट्स असले तरी हे फॅट्स मीडियम चिल्ड फॅटी अॅसिड असतात. यामुळे हे फॅट्स शरीरात चरबीप्रमाणे साचत नाहीत.त्याचबरोबर नारळाच्या दुधामुळे बराच वेळ भुकेवर नियंत्रण राहते.
फिट ठेवण्यास मदत करते
नारळ पाणी आपल्याला फिट ठेवते. पोटॅशियम कमतरतेमुळे स्नायुंमध्ये जडपणा येतो आणि नारळ पाणी पोटॅशियम समृध्द आहे. त्यामुळे याचा नियमितपणे वापर करायला हवा.
मधूमेह प्रमाणात ठेवते:
तुमच्या रक्तातील शूगरचे प्रमाण स्थिर करण्यासाठी नारळाच्या खोबऱ्याचा फायदा होतो. नारळामुळे शरीरातील ग्लुकोजचे प्रमाण कमी व्हायला मदत होते. आहारात नारळ नियमित असेल तर मधूमेह होणार नाही.
News English Summary: Nature’s deeds and coconut water’ is really a fact because coconut water is very good for your health. Coconut water contains many more nutrients like electrolyte, potassium, iron, manganese, vitamin C and folate. Although coconut water tastes sweet, it contains natural sugars and artificial sweeteners are rarely used. So it has no effect on your body or blood sugar level. Coconut water is considered the best during pregnancy.
News English Title: Drinking coconut water is beneficiary to our health news update article
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार