22 November 2024 8:45 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

लसीचा बाजार | सिरमकडून राज्यांसाठी ३०० रु प्रति डोस | केंद्राला केवळ रु. १५० प्रति डोस

covishield

मुंबई, २८ एप्रिल | देशात कोरोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणासाठी आजपासून नोंदणीला सुरुवात झाली आहे. लस उत्पादक कंपन्यांनी कोरोना लसीच्या किमती कमी कराव्यात, अशी विचारणा केंद्र सरकारनं सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेकला केली होती. कोविशील्ड लसीच्या किमती राज्य सरकारांसाठी 100 रुपयांनी कमी करत आहोत, अशी माहिती सीरमचे प्रमुख आदर पुनावाला यांनी दिली आहे. आदर पुनावाला यांनी ही माहिती ट्विटद्वारे दिली.

पुनावाला म्हणाले की, राज्यांना कोवीशील्ड आता 400 ऐवजी 300 रुपयांना मिळेल. यामुळे राज्यांच्या हजारो कोटी रुपयांची बचत होईल. यातून ते जास्तीत-जास्त लस खरेदी करू शकतील आणि लोकांचे आयुष्य वाचवू शकतील.

केंद्राला 150 रुपयांना मिळते लस;
21 एप्रिलला सीरमने व्हॅक्सीनच्या नवीन किमती ठरवल्या होत्या. तेव्हा खासगी रुग्णालयांसाठी लस 600 रुपयांना देण्याचे ठरले होते. यापूर्वी या रुग्णालयांना हीच लस 250 रुपयांना दिली जात होती. तेव्हा राज्यांसाठी दर 400 रुपये आणि केंद्रासाठी 150 रुपये होते.

एकूण प्रोडक्शनचा 50% राज्यांना दिला जातो;
सीरममधून आता जितकी लस तयार होते, त्यातील 50% केंद्राच्या लसीकरण कार्यक्रमाला दिली जाते. उर्वरित 50% राज्य आणि खासगी रुग्णालयांना दिली जाते.

 

News English Summary: Registration for the third phase of corona vaccination in the country has started from today. The central government had asked the Serum Institute and Bharat Biotech to reduce the prices of corona vaccines. We are reducing the price of Covishield vaccine by Rs 100 for state governments, said Adar Punawala, head of Serum. Adar Punawala tweeted this information.

News English Title: Adar Poonawalla declared serum institute covishield vaccine new pricing for states news updates.

हॅशटॅग्स

#Vaccination(44)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x