22 November 2024 5:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
x

कोविन अँपवर नोंदणी असेल तरच लस मिळणार हे कृपया समजून घ्या, दुसरा डोसवाल्यांना प्राधान्य - महापौर

Mumbai vaccination

मुंबई, २९ एप्रिल | मुंबईच्या गोरेगावमधील नेस्को कोरोना केंद्र आणि बीकेसी केंद्रावर लसीकरणासाठी नागरिकांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत. लसींचा तुटवडा असल्याने आपल्यालाच लस मिळावी म्हणून नागरिकांनी पहाटे 7 वाजल्यापासून केंद्रावर गर्दी केल्याने दोन किलोमीटरपर्यंत ही रांग गेली आहे. त्यांची मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दखल घेतली आहे. नागरिकांनी केंद्रावर गर्दी करू नये. कोविन अॅपवर नोंदणी करणाऱ्यांनाच लस मिळणार आहे. तसेच ज्यांचा पहिला डोस झालेला आहे, त्यांनाच प्राधान्याने डोस दिला जाणार असल्याचं महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट केलं आहे.

गोरेगावच्या नेस्को केंद्रावर आणि वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स केंद्रावर नागरिकांची गर्दी झाल्याने त्यावर महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सर्वांनाच व्हॅक्सिन मिळणार आहे. लस जशी उपलब्ध होईल, तशा लस देण्यात येणार आहेत. गोरेगावच्या नेस्को केंद्रावरील गर्दी चिंताजनक आहे. नागरिकांनी प्रत्येक सेंटरवर अशी गर्दी केली तर बाधित होण्याची शक्यता अधिक आहे. गर्दीत एखादा व्यक्ती जरी बाधित असेल तर दुसऱ्यांना लागण होऊ शकते. त्यामुळे ज्या कारणासाठी लसीकरण होतंय ते बाजूला राहिल. म्हणून नागरिकांनी बोलावल्याशिवाय केंद्रावर येऊ नये, असं महापौर पेडणेकर यांनी सांगितलं.

लस देणं जेवढं आम्हाला बंधनकारक आहे. तेवढंच नागरिक म्हणून स्वयंशिस्त पाळणंही बंधनकारक आहे, असं सांगतानाच मी स्वत: नेस्को केंद्रावर जाऊन माहिती घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. तसेच येणार्या व्हॅक्सीनचा पहिला डोस हा दुसऱ्या डोसवाल्यांनाच देण्यात येणार आहे. त्यांचे डोस पूर्ण करणे ही आमची जबाबदारी आहे. दुसऱ्या डोसवाल्यांना डोस दिल्यानंतर पहिल्या डोसवाल्यांना डोस दिला जाईल, असंही त्या म्हणाल्या.

 

News English Summary: Citizens line up for vaccinations at the NESCO Corona Center and BKC Center in Goregaon, Mumbai. Due to shortage of vaccines, the queue has been extended for two kilometers as citizens have been flocking to the center since 7 am to get the vaccine. He has been noticed by Mumbai Mayor Kishori Pednekar.

News English Title: Mumbai Mayor Kishori Pednekar reaction on long queues of outside vaccination centres in Mumbai news updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x