Health First | डिंकाचे पदार्थ आपल्या आरोग्यास लाभदायक । नक्की वाचा

मुंबई २९ एप्रिल : थंडीच्या दिवसात आपल्या खाण्यापिण्याच्या टाईमटेबलमध्ये बरेच बदल होतात. या दिवसांमध्ये उष्णपदार्थ आवर्जून खावे असा सल्ला आवर्जून दिला जातो. यामुळे शरीराला उर्जा तर मिळतेच त्यासोबतच अनेक आजारांपासूनही रक्षण होते. याच कारणामुळे थंडीच्या दिवसात डिंकाचे लाडू बनवले जातात. ज्यामुळे शरीराला उर्जा मिळते आणि आरोग्यही चांगले राहते. तसंच डिंक भाजूनही खातात. अशाप्रकारे डिंक खाल्ल्यास हाडंही मजबूत होतात आणि थंडीच्या दिवसात दुखत नाहीत. तसंही डिंकाचा उपयोग औषधं, बेकरी आणि ब्युटी प्रोडक्ट्समध्येही वापरला जातो. याशिवाय एनर्जी ड्रींक्स, आईसक्रिममध्येही डिंकाचा वापर केला जातो. चला जाणून घेऊया डिंक खाण्याचे फायदे.
कोणता डिंक खावा?
झाडाच्या खोडाला छेद देऊन जो चीक निघतो. त्याला साठवलं जातं आणि तो कडक झाल्यावर त्याचा वापर केला जातो. त्यालाच डिंक म्हणतात. पण लक्षात घ्या की, प्रत्येक झाडातून निघणारा डिंक खाण्यालायक नसतो. बाभळीचा झाडाचा डिंक आरोग्यासाठी चांगला मानला जातो. बाजारात तुम्हाला खाण्याचा डिंक अगदी सहज मिळतो. आजकाल तर तुम्हाला ऑनलाईनही ऑर्डर करता येतो.
डिंक खाण्याचे फायदे :
सांधेदुखीला ठेवतं लांब:
थंडीच्या दिवसात डिंकाचं सेवन सर्वात फायदेशीर मानलं जातं. कारण यामुळे शरीराला उष्णता मिळते. सकाळच्या वेळी डिंक खाणं चांगलं मानलं जातं. थंडीच्या दिवसात डोक्याला तरतरी यावी आणि सांधेदुखीच्या समस्या दूर करण्यासाठी डिंक खाण्याचा फायदा होतो. डिंकामुळे हाडंही मजबूत होतात. डिप्रेशनपासूनही सुटका होते आणि मांसपेशीही मजबूत होतात.
स्टॅमिना आणि प्रतिकार शक्ती वाढते:
डिंक खाल्ल्याने शरीराची रोग प्रतिकारक क्षमता वाढते. यामुळे थंडीच्या दिवसात आवर्जून डिंकाचे लाडू केले जातात आणि खाल्ले जातात.
प्रसूतीनंतर आईला चांगलं दूध येण्यासाठी:
प्रसूतीनंतर नवजात शिशूच्या आईला डिंकाचे लाडू दिले जातात. प्रसूतीनंतर चांगलं दूध यावं आणि हाडांना बळकटी मिळवण्यासाठी डिंकाचा उपयोग होतो.
त्वचेसाठीही आहे फायदेशीर:
डिंक हा त्वचेसाठीही चांगला असतो. डिंक स्किन केअर एजंटच्या रूपात कार्य करतो आणि चेहऱ्याला पोषण देतो.
फुफ्फुस्सांची समस्याही होईल दूर:
ज्या लोकांना फुफ्फुस्सासंबंधित त्रास असतो, अशक्तपणा आणि थकवा जाणवतो. त्यांनी डिंक अवश्य खावा.
हृदयासाठीही आहे लाभदायक:
रोज भाजलेला डिंक खाल्ल्यास हृदयविकाराचा थोका टाळता येईल. हृदयासंबंधित इतर रोगांवरही डिंक फायदेशीर आहे. शरीरातील रक्ताची कमतरता पूर्ण करण्यासाठी डिंकाचे लाडू किंवा खीर करून त्याचं सेवन करावं.
News English Summary: There are many changes to your eating schedule on a cold day. It is advisable to eat hot food these days. This not only gives energy to the body but also protects it from many diseases. This is the reason why Dink laddu is made on cold days. Which gives energy to the body and keeps the health good. They also eat roasted gum. Eating gum in this way also strengthens the bones and does not hurt on cold days.
News English Title: Eating gum or gond is beneficiary to our health news update article
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL