22 November 2024 6:33 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Health First | अल्सर म्हणजे काय ? तो होण्याची कारणे आणि उपाय जाणून घ्या । नक्की वाचा

Home remedies for Ulcer

मुंबई 30 एप्रिल: अल्सर म्हणजे पोटात होणाऱ्या जखमा होय. जेव्हा हे घाव आतड्यांत किंवा अन्न नलिकेमध्ये तयार होतात तेव्हा रुग्णाला काही खाताना वा पिताना खूप वेदना होतात आणि मोठा त्रास होतो. चावलेला कोणताही पदार्थ गिळताना सुद्धा अशी जाणीव होते जसे की काहीतरी आपला गळा चिरून आतमध्ये शिरत आहे. या स्थितीत रुग्ण साधं पाणी पिताना सुद्धा घाबरतो. कारण पाणी पिताना सुद्धा खूप जळजळ आणि वेदना होतात. पोटाच्या वेगवेगळ्या भागात होणाऱ्या अल्सरच्या आजराला वेगवेगळी नावे आहेत आणि हे अल्सर तयार होण्याची कारणे सुद्धा वेगवेगळी असतात. पोटात तयार होणाऱ्या अल्सरला गॅस्ट्रिक अल्सर आणि आतड्यांत होणाऱ्या अल्सरला डुओडिनल अल्सर म्हटले जाते.

अल्सरची कारणे कोणती?

  1. ‘एच पायलोरी’ नावाच्या जंतूचा संसर्ग हे जठराच्या तसेच लहान आतडय़ाच्या सुरुवातीच्या भागाच्या अल्सरचे एक महत्त्वाचे कारण आहे. या जंतूंची लागण दूषित अन्न व पाण्यातून होते.
  2. वेदनाशामक गोळ्यांचा अनावश्यक वापर किंवा काही आजारांमुळे दीर्घ काळ पित्तकारक औषधे घ्यावी लागणे यामुळेही अल्सर होऊ शकतो.
  3. धूम्रपान व मद्यपान
  4. सातत्याने खूप तिखट व मसालेदार खाणे
  5. अतिरिक्त ताण व त्यामुळे वाढणारे आम्लपित्त हे देखील अल्सरसाठी कारणीभूत ठरू शकते.
  6. अल्सर सर्वसाधारणपणे वयाच्या विशीनंतर आढळणारा आजार आहे. तरुणांमध्ये तसेच वृद्धांमध्येही अल्सरचे रुग्ण सापडतात.

अल्सर होऊ नये म्हणून:

  1. जीवनशैलीतील सकारात्मक बदल हे अल्सर टाळण्यासाठीचा उत्तम उपाय.
  2. वारंवार अति मसालेदार खाणे, धूम्रपान व मद्यपान टाळावे.
  3. रात्रीची जागरणे टाळलेलीच बरी.
  4. अनेकांना क्रोसिन, काँबिफ्लॅम किंवा इतर कुठल्याही वेदनाशामक गोळ्या वारंवार घेण्याची सवय असते. गरज नसताना या गोळ्यांचा वापर टाळावा.

अल्सरवर उपाय काय आहेत?
अल्सर ठीक करण्यासाठी सर्वात प्रथम म्हणजे आहारात बदल करावा लागतो. याबाबत तुम्ही अनुभवी आणि तज्ञ डॉक्टरांचाच सल्ला घ्यावा. ते तुम्हाला याबाबतीत योग्य मार्गदर्शन करू शकतील. कारण अल्सरचे प्रमाण किती आहे त्यानुसार डॉक्टर आहार ठरवून देतात. आहार तयार करताना तुम्ही कोणत्या वातावरणात राहता, आसपास स्थिती कशी आहे यासारख्या गोष्टी सुद्धा डॉक्टरांन पाहाव्या लागतात. सध्या अल्सरवर अनेक औषधे आली आहेत जी शरीरातील आम्लाचे प्रमाण कमी करतात आणि अल्सर हळूहळू ठीक होऊ लागतो. ज्यांचा अल्सर अधिक गंभीर झाला आहे त्यांच्यावर ऑपरेशन करूनच उपचार करावे लागतात.

News English Summary: Ulcers are stomach ulcers. When these lesions form in the intestines or esophagus, the patient is in great pain and discomfort when eating or drinking something. Even when swallowing any bite, you feel as if something is slitting your throat and getting inside. Stomach ulcers are called gastric ulcers and intestinal ulcers are called duodenal ulcers.

News English Title: Reasons and remedies for Ulcer news update article

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x