Health First | अल्सर म्हणजे काय ? तो होण्याची कारणे आणि उपाय जाणून घ्या । नक्की वाचा
मुंबई 30 एप्रिल: अल्सर म्हणजे पोटात होणाऱ्या जखमा होय. जेव्हा हे घाव आतड्यांत किंवा अन्न नलिकेमध्ये तयार होतात तेव्हा रुग्णाला काही खाताना वा पिताना खूप वेदना होतात आणि मोठा त्रास होतो. चावलेला कोणताही पदार्थ गिळताना सुद्धा अशी जाणीव होते जसे की काहीतरी आपला गळा चिरून आतमध्ये शिरत आहे. या स्थितीत रुग्ण साधं पाणी पिताना सुद्धा घाबरतो. कारण पाणी पिताना सुद्धा खूप जळजळ आणि वेदना होतात. पोटाच्या वेगवेगळ्या भागात होणाऱ्या अल्सरच्या आजराला वेगवेगळी नावे आहेत आणि हे अल्सर तयार होण्याची कारणे सुद्धा वेगवेगळी असतात. पोटात तयार होणाऱ्या अल्सरला गॅस्ट्रिक अल्सर आणि आतड्यांत होणाऱ्या अल्सरला डुओडिनल अल्सर म्हटले जाते.
अल्सरची कारणे कोणती?
- ‘एच पायलोरी’ नावाच्या जंतूचा संसर्ग हे जठराच्या तसेच लहान आतडय़ाच्या सुरुवातीच्या भागाच्या अल्सरचे एक महत्त्वाचे कारण आहे. या जंतूंची लागण दूषित अन्न व पाण्यातून होते.
- वेदनाशामक गोळ्यांचा अनावश्यक वापर किंवा काही आजारांमुळे दीर्घ काळ पित्तकारक औषधे घ्यावी लागणे यामुळेही अल्सर होऊ शकतो.
- धूम्रपान व मद्यपान
- सातत्याने खूप तिखट व मसालेदार खाणे
- अतिरिक्त ताण व त्यामुळे वाढणारे आम्लपित्त हे देखील अल्सरसाठी कारणीभूत ठरू शकते.
- अल्सर सर्वसाधारणपणे वयाच्या विशीनंतर आढळणारा आजार आहे. तरुणांमध्ये तसेच वृद्धांमध्येही अल्सरचे रुग्ण सापडतात.
अल्सर होऊ नये म्हणून:
- जीवनशैलीतील सकारात्मक बदल हे अल्सर टाळण्यासाठीचा उत्तम उपाय.
- वारंवार अति मसालेदार खाणे, धूम्रपान व मद्यपान टाळावे.
- रात्रीची जागरणे टाळलेलीच बरी.
- अनेकांना क्रोसिन, काँबिफ्लॅम किंवा इतर कुठल्याही वेदनाशामक गोळ्या वारंवार घेण्याची सवय असते. गरज नसताना या गोळ्यांचा वापर टाळावा.
अल्सरवर उपाय काय आहेत?
अल्सर ठीक करण्यासाठी सर्वात प्रथम म्हणजे आहारात बदल करावा लागतो. याबाबत तुम्ही अनुभवी आणि तज्ञ डॉक्टरांचाच सल्ला घ्यावा. ते तुम्हाला याबाबतीत योग्य मार्गदर्शन करू शकतील. कारण अल्सरचे प्रमाण किती आहे त्यानुसार डॉक्टर आहार ठरवून देतात. आहार तयार करताना तुम्ही कोणत्या वातावरणात राहता, आसपास स्थिती कशी आहे यासारख्या गोष्टी सुद्धा डॉक्टरांन पाहाव्या लागतात. सध्या अल्सरवर अनेक औषधे आली आहेत जी शरीरातील आम्लाचे प्रमाण कमी करतात आणि अल्सर हळूहळू ठीक होऊ लागतो. ज्यांचा अल्सर अधिक गंभीर झाला आहे त्यांच्यावर ऑपरेशन करूनच उपचार करावे लागतात.
News English Summary: Ulcers are stomach ulcers. When these lesions form in the intestines or esophagus, the patient is in great pain and discomfort when eating or drinking something. Even when swallowing any bite, you feel as if something is slitting your throat and getting inside. Stomach ulcers are called gastric ulcers and intestinal ulcers are called duodenal ulcers.
News English Title: Reasons and remedies for Ulcer news update article
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार