22 November 2024 12:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON
x

वेदना किंवा ताप असेल तर पेन किलर खाणे टाळा, कोरोना असल्यास गंभीर होऊ शकतो रुग्ण - ICMR चा इशारा

ICMR

नवी दिल्ली, ३० एप्रिल | केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून दररोज देशातील मागील २४ तासांतील रुग्ण आणि मृत्यूची आकडेवारी जाहीर केली जाते. गुरुवारी आढळून आलेल्या नव्या रुग्णांची संख्या प्रसिद्ध करण्यात आली आहे. देशात २४ तासांत ३ लाख ८६ हजार ४५२ नवीन करोना बाधितांची नोंद झाली आहे. देशवासीयांना काळजीत टाकणारी बाब म्हणजे याच कालावधीत देशात ३ हजार ४९८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काहीसा दिलासा देणारी एक बाब म्हणजे २ लाख ९७ हजार ५४० रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. देशात आतापर्यंत २ लाख ८ हजार ३३० जणांचा मृत्यू झाला असून, सध्या ३१ लाख ७० हजार २२८ रुग्ण उपचार घेत आहेत.

दरम्यान, लोकांना सध्याच्या गंभीर परिस्थितीवरून अनेक प्रश्न पडल्याचं पाहायला मिळतंय. त्यालाच अनुसरून काही प्रश्नांची उत्तर तज्ज्ञांच्या सल्ल्यातून घेण्याचा प्रयत्न प्रसार माध्यमांनी केला आहे. त्यानुसार कोरोनामध्ये पेन किलर औषधी घातक ठरू शकतात. ICMR (इंडियन काउंसिल फॉर मेडिकल रिसर्च) ने ताज्या रिपोर्टमध्ये इबुप्रोफेन सारख्या अनेक पेन किलर्समुळे कोरोना धोका अधिक वाढतो असे म्हटले आहे. हृदयरोग्यांसाठी हानिकारक मानली जाणारी ही औषधे मूत्रपिंडाचा धोकादेखील वाढवतात.

कोरोनामध्ये पेन किलर औषधी घातक ठरू शकतात. आयसीएमआरच्या म्हणण्यानुसार, लोकांनी एनएसएआयडी (नॉन-स्टेरॉइडल एंटी-इंफ्लेमेटरी ड्रग्स) टाळावे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यावरच ही औषधे घ्यावीत. आवश्यक असल्यास पॅरासिटामॉल घ्या. हे सर्वात सुरक्षित वेदनाशामक औषधांपैकी एक आहे. शरीरात ताप किंवा वेदना असल्यास लोक तात्पुरता दिलासा मिळावा म्हणून एंटी इंफ्लेमेटरी आणि एंटी पायरेटिक औषधे घेतात. यापैकी सर्वात पॅरासिटामॉलसोबत इबुप्रोफेन मिसळून तयार केलेली औषधे आहेत.

आयसीएमआर सांगते की, हृदयरोग, मधुमेह किंवा उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांना इतरांच्या तुलनेत कोरोनाचा संसर्गाचा धोका जास्त असतो, असे नाही. मात्र जगातील आतापर्यंतच्या अनुभवावरून या आजारांनी ग्रस्त लोकांमध्ये कोरोना झाल्यावर गंभीर लक्षणे दिसली आहेत. म्हणून, अशा लोकांना अधिक काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. आयसीएमआरचा सल्ला आहे की, मधुमेहाच्या रुग्णांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य आहार आणि योग्य व्यायामाची आवश्यकता असते. या रूग्णांनी वारंवार त्यांची साखरेची पातळी तपासून पहावी आणि नियमितपणे औषधे घ्यावीत.

त्याचप्रमाणे हृदयरोग असलेल्या रुग्णांना वेळेवर औषधे घेणे खूप महत्वाचे आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधोपचार थांबवू नका. जर तुम्ही डॉक्टरांना भेटू शकत नसाल तरी तुमची सुरु असलेली औषधे घेत राहा. विशेषतः कोलेस्ट्रॉल (स्टॅटिन) आणि मधुमेहावरील औषधे नियमिच घ्यावी.

 

News English Summary: Painkillers in the corona can be lethal. A recent report by the ICMR found that many pain killers, such as ibuprofen, increase the risk of corona. These drugs, which are considered harmful for heart patients, also increase the risk of kidney failure.

News English Title: Avoid consumption of pain killers if there is pain or fever because of corona ICMR alert news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x