Health First | घसा खवखवत किंवा दुखत असेल तर करा हे उपचार
मुंबई १ मे : जेव्हा जेव्हा ऋतूमध्ये बदल होतो तेव्हा त्याचा सर्वात जास्त परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. ज्यामध्ये घसा खवखवणे, घसा दुखणे, सर्दी-खोकला आणि ताप यासारखे आजार होणं कॉमन आहे. सर्दी-खोकल्या झाल्यावर घसा खवखवण्याचा (sore throat) होणारा त्रास हा खूपच त्रासदायक आणि वेदना देणारा असतो. घसा खवखवण्यामुळे आपल्या जेवणावरही आणि पूर्ण रूटीनवरच परिणाम होतो. जेव्हा आपल्या शरीरामध्ये एखादा व्हायरस किंवा बॅक्टेरियामुळे कोणत्याही प्रकारचं इंफेक्शन होतं तेव्हा आपलं शरीर प्रतिकारशक्तीनुसार प्रतिक्रिया देतं त्यामुळे आपल्याला घसा खवखवण्याचा त्रास होतो.घसा दुखत असल्यास या गोष्टी केल्यामुळे तुम्हाला आराम मिळू शकतो.
कोमट पाणी अथवा द्रवपदार्थ प्या:
कोमट पाण्यामुळे घशाचा दाह कमी होतो.तुम्हाला कोमट पाणी पिण्याचा कंटाळा येत असेल तर तुम्ही गरम सूप अथवा एक कप आल्याचा चहा घेऊ शकता.त्याचप्रमाणे भरपूर पाणी प्यायल्यामुळे देखील तुमचा घसा कोरडा न रहाता ओलसर राहील व तुम्हाला अधिक आराम मिळेल.
गुळण्या करा:
घशामध्ये खवखवण्याचा त्रास होत असेल तर कोमट पाण्यामध्ये मीठ घालून गुळण्या करा.यामुळे तुम्हाला चांगला आराम मिळू शकेल.या मीठाच्या पाण्यामध्ये तुम्ही अर्धा चमचा हळद देखील घालू शकता.मीठाच्या पाण्याच्या गुळण्या केल्यामुळे घशामधील कफचा अडथळा कमी होतो व गरम पाण्यामुळे कफ पातळ झाल्यामुळे बाहेर टाकणे सोपे होते सहाजिकच त्यामुळे घशाचा दाह कमी होतो. एक मध्यम आकाराच्या ग्लासभर पाण्यात तीन कडीलिंबाची पाने घेऊन ते पाणी उकळा.पाणी थंड झाल्यावर त्यामध्ये एक चमचा मध टाका व त्या पाण्याच्या गुळण्या करा तुम्हाला त्वरीत आराम मिळेल.
गरम पाण्याचे वाफारे घ्या:
गरम पाण्याच्या वाफा घेतल्याने घशातील श्वसनमार्गाला आराम मिळतो.कधीकधी यावर कोमट पाण्याने अंघोळ केल्यास देखील बरे वाटते.अशा वेळी पाण्यात निलगिरीच्या तेलाचे काही थेंब टाकल्याने देखील पटकन बरे वाटू शकते.
दमट वातावरणात रहा:
कोरड्या हवेमुळे घश्याला त्रास होतो.ह्यूमीडीफायर मुळे तुमच्या खोलीतील वातावरण दमट होईल व तुमच्या घश्याला आराम मिळेल.
खोकल्यावर गुणकारी पदार्थ तोंडात ठेवा:
घसा दुखत असल्यास बाजारात मिळणा-या खोकल्यावरच्या गोळ्या तोंडात ठेवा.त्यातील थंडाव्यामुळे तुम्हाला आराम मिळेल.मिंथॉल व मधासारख्या अॅन्टीसेफ्टिक घटकांमुळे तुमच्या घसा कमी खवखवेेल.अशा गोळ्या बाजारात सहज उपलब्ध असतात. मऊ पदार्थ खा व तिखट,आंबट,तळलेले पदार्थ खाणे टाळा.
घसा दुखत असल्यास अन्नपदार्थ गिळणे कठीण जाते.त्यामुळे घशाला वेदना न होता गिळता येतील असे मऊ अन्नपदार्थ खा.तिखट व अॅसिडीक अन्नपदार्थांमुळे घशाला त्रास होतो त्यामुळे घसा दुखत असल्यास हे पदार्थ खाणे टाळा.त्याचप्रमाणे तेलकट पदार्थ देखील खाणे टाळा कारण ते कडक व क्रिस्पी असल्याने ते गिळताना तुम्हाला वेदना होऊ शकतात.
ओटीसी औषधे घ्या:
कफ सुकल्यामुळे किंवा इनफेक्शनमुळे घसा खवखवू लागतो.अशा वेळी ओटीसी औषधे घेतल्याने आराम मिळू शकतो.कफ सुकल्यामुळे तो प्रवाहीत होत नाही व घशामध्ये अडथळा निर्माण होतो.पण या औषधांमुळे कफ पातळ झाल्यामुळे बाहेर टाकता येतो व बरे वाटू लागते.
घरगुती उपाय करा:
घसा दुखत असल्यास घरगुती उपायांचा देखील चांगला फायदा होऊ शकतो.स्वयंपाकासाठी वापरण्यात येणा-या मधात अॅन्टी-वायरल व अॅन्टी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. त्यामुळे घसा दुखत असल्यास त्याचा तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो. त्याचप्रमाणे आले, काळीमिरी, मध, लसूण, तुळस आणि हळद यामुळे देखील तुम्हाला आराम मिळू शकतो. त्यामुळे हे पदार्थ वापरुन तयार केलेली चहा किंवा पेय घ्या.
इतर काही घरगुती उपाय:
- घसा दुखत असल्यास आल्याचा तुकडा तोंडात ठेऊन चावा. त्यामुळे तुम्हाला लवकरआराम मिळेल. किंवा आल्याचे चार तुकडे, दोन टोमॅटो, मध यांचा रस करुन प्या.
- पाण्यात मध व कांदा टाकून उकळा व गाळून ते पाणी थोडयाथोड्या वेळाने प्या.
- मधात काही लवंगा टाका. काही तासांनी लवंगा काढून त्याचे चाटण खा. लवंगामुळे वेदना कमी होतील व मधाने घशाला आराम मिळेल.
- पाण्यात बडीसोप टाकून ते काही मिनीटे उकळा त्यानंतर पाणी गाळून घ्या व त्यात मध टाकून थोड्या थोड्या वेळाने प्या.
- लिंबाचा रस व एक चमचा मध टाकलेले गरम पाणी प्या.
- भरपूर आराम करा. व्यवस्थित आराम केल्यामुळे शरीर इनफेक्शनला प्रतिकार करु शकते.
News English Summary: Whenever there is a change in the seasons, it has the greatest effect on our health. It is common to have sore throats, sore throats, colds, coughs and fevers. When your body is immune to any kind of infection caused by a virus or a bacterium, you have a sore throat. Can be found.
News English Title: Home remedies for sore throat news update article
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News