भारतातील सर्वात शक्तिशाली राजकीय व्यक्तींकडून मला सत्य बोलल्यास शीर कापण्याची धमकी - अदर पुनावाला
लंडन, ०१ मे | भारताची प्रमुख लस उत्पादक कंपनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आता इतर देशांमध्ये लस उत्पादन घेण्याचा विचार करत आहे. लशीच्या पुरवठ्याबाबतच्या वेळेचं आश्वासन पाळण्यात अडचण येऊ लागल्यानं ‘सीरम’ हे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे, अशी माहिती सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी दिली आहे. सध्या सीरम इस्टिट्यूटचे अदर पुनावाला लंडनला निघून गेले आहेत. परंतु, ‘द टाईम्स’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की मला धमक्या मिळत आहेत, आणि सत्य बोललो तर माझे शीर कापले जाईल, अशीही भीती त्यांनी व्यक्त केली आहे.
त्यांनी या मुलाखतीत म्हटलंय की, आपल्या देशातील श्रीमंत आणि मोठ्या मोठ्या राजकीय हस्थींकडून त्यांना या धमक्या येत आहेत. आणि यामुळे ते कोरोना लशीचे उत्पादन लंडन मध्ये करण्याच्या तयारीत आहेत, असं म्हटलं जात आहे. ‘The Times’ ने याबाबत सविस्तर वृत्त दिलं आहे. या वृत्तात जगातील सर्वात मोठे लस उत्पादक अदर पुनावाला यांनी म्हटलंय की, फोन कॉल ही सर्वात वाईट गोष्ट आहे. निरंतर येणारे फोन कॉल्स अत्यंत त्रासदायक आहेत.
पुढे त्यांनी म्हटलंय की, हे कॉल भारतातील सर्वात शक्तिशाली व्यक्तींकडून येतात. भारतीय राज्यांमधील मुख्यमंत्र्यांकडून, व्यवसायिक प्रमुखांनी आणि इतरांनी कोविशिल्ड लशीच्या तत्काळ पुरवठ्याची मागणी केली आहे. धमक्या हा ‘एक अतिरेकीपणा आहे’ पुढे पुनावाला यांमी म्हटलंय की, यांतील अपेक्षा आणि आक्रमकतेची पातळी खरोखर अभूतपूर्व आहे.
अलिकडेच गृहमंत्रालयाने सीरम इन्स्टिट्यूटचे CEO अदर पुनावाला यांनी Y सिक्यूरिटी प्रदान करण्याचे आदेश दिले होते. CRPF द्वारे त्यांना ही सुरक्षा देण्यात येणार आहे. सध्या जगभरात प्राधान्याचा विषय कोणता असेल तर तो म्हणजे कोरोनाविरोधातील लढ्याचा! पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ही जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी आहे. त्यामुळे या इन्स्टिट्यूटला मोठं महत्त्व प्राप्त झालं आहे. अदर पुनावाला हे या कंपनीचे CEO आहेत. सध्या महत्त्वाच्या जागी आणि प्रकाशझोतात असणाऱ्या अदर पुनावाला यांच्या जीविताला धोका संभवू शकतो. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला होता.
News English Summary: He said in the interview that he was receiving threats from rich and big political figures in his country. And because of this they are preparing to produce corona vaccine in London, it is said. The Times has given a detailed report on this. “Phone calls are the worst thing,” said Adar Poonawala, the world’s largest vaccine manufacturer. Frequent phone calls are extremely annoying.
News English Title: Adar Poonawala interview given to the times says he got threat calls aggression over Covid vaccines is overwhelming news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- BEL Vs Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 45% पर्यंत मिळेल परतावा - NSE: TATAMOTORS
- Infosys Share Price | आयटी इन्फोसिस शेअर चार्टवर रॉकेट तेजीचे संकेत, मजबूत कमाई होणार - NSE: INFY
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन