20 April 2025 12:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | पगारदारांनो, ही फंडाची योजना गुंतवणूकदारांचे पैसे 4 ते 5 पटीने वाढवत आहे, इथे पैसा वाढवा Horoscope Today | 20 एप्रिल 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Kalyan Jewellers Share Price | सोनं नव्हे, सोनं बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स खरेदी करा, झपाट्याने पैसा वाढेल - NSE: KALYANKJIL Mishtann Foods Share Price | 5 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - BOM: 539594 Motherson Sumi Wiring Price | शेअर प्राईस 52 रुपये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, किती परतावा मिळेल पहा - NSE: MSUMI Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 20 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bajaj Finance Share Price | लाखो टक्क्यांमध्ये परतावा देणारा शेअर, आता पुढची टार्गेट प्राईस ही आहे - NSE: BAJFINANCE
x

Health First | लवंगाचे आरोग्यास होणारे फायदे जाणून घ्या

benefits of clove

मुंबई २ मे : लवंग नक्कीच आकाराने लहान आहे मात्र लवंग खाण्याचे फायदे चमत्कारी आहेत. अनादी काळापासून लवंगेचा उपयोग आयुर्वेदिक औषधांमध्येही करण्यात आला आहे. यामध्ये असे औषधीय गुण आहेत जे शरीरात असलेल्या अनेक समस्या दूर करण्यास मदत करते. खरं तर याचा जास्तीत जास्त उपयोग हा जेवणामध्ये आणि सर्दी अथवा खोकला झाला असल्यास, करण्यात येतो. पण त्याव्यतिरिक्तही लवंग आणि लवंग तेलाचे फायदे अनेक आहेत.

बघूया लवंगांचे असेच काही फायदे…

पोटदुखीवर लाभदायक
गॅस, अपचन, ऍसिडिटी, कॉन्स्टिपेशन सारख्या समस्यांनी ग्रस्त असलेल्यांसाठी लवंग खूप उपयुक्त ठरते. सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास पाण्यात लवंग तेलाचे काही थेंब टाकून ते पाणी प्यावे. यामुळे खूप आराम मिळे. जर आपण दररोज हा उपयोग केला तर वरील समस्या कायमस्वरूपी दूर होऊ शकतात.

चेहऱ्यावरील डाग दूर करणे
चेहऱ्यावरील डाग दूर करण्यात लवंग खूप फायदेशीर आहे. यासाठी लवंगची पावडर बनवून कोणत्याही फेस पॅकमध्ये किंवा बेसन आणि मधामध्ये मिसळून हा पॅक चेहऱ्यावर लावावा. त्यानं चेहरा स्वच्छ व निर्जंतूक होतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा लवंगाची नुसती पावडर चेहऱ्याला लावू नका, ती खूप गरम होते. कोणत्याही फेसपॅकमध्ये मिसळूनच लवंग पावडरचा वापर करा.

केसांना चमकदार आणि सिल्की बनवते
ज्या लोकांना केसगळतीचा त्रास आहे आणि ज्यात केस कोरडे आहेत त्यांनी लवंगांपासून बनवलेल्या कंडीशनरचा वापर करावा. सोबतच लवंग थोड्या पाण्यात टाकून ते गरम करावे आणि त्या पाण्यानं केस धुवावेत. यामुळे केस काळे, मजबूत होतात. आपण लवंग तेल खोबरेल तेलात मिसळून त्यानं मालिशही करू शकतो.

तोंडाची दुर्गंधी दूर करते लवंग
आपल्या तोंडाला जर दुर्गंध येत असेल तर लवंग खाणं सुरू करा. जवळपास ४० ते ४५ दिवस दररोज सकाळी १-२ लवंग तोंडात ठेवाव्यात यानं दुर्गंधीची समस्येचा नायनाट होईल.

याशिवाय लवंगांचे काही खास उपयोग:

  • डोके दुखत असल्यास लवंगाचे तेल किंवा लवंगांचा लेप लावावा.
  • दात दुखत असल्यास किंवा हिरड्यांना सूज आल्यास लवंग तोंडात धरून चघळावी.
  • दमा, खोकला, आम्लपित्त यांवरही लवंगांचा उपयोग होतो.
  • सर्दी आणि खोकला यावर लवंगांचा काढा करून त्यात मध घालून द्यावा, कफ मोकळा होतो.
  • उलटी किंवा मळमळ होत असल्यास लवंग चघळल्यानेदेखील आराम पडतो.
  • सूज आल्यास त्यावर लवंगीचे तेल चोळून लावल्यानं आराम मिळतो.
  • अँटिबॅक्टेरिअल म्हणून लवंग काम करते.
  • रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी मधुमेह झालेल्या रुग्णांसाठी लवंग अतिशय फायदेशीर ठरते.

News English Summary: Clove is certainly small in size but the benefits of eating cloves are miraculous. Clove has also been used in Ayurvedic medicine since time immemorial. It has medicinal properties that help to alleviate many problems in the body. In fact, it is most commonly used in meals and if you have a cold or cough. But other than that, the benefits of clove and clove oil are many.

News English Title: Clove is beneficiary to our health news update article

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या