Special Recipe | असे दहीवडे बनवाल तर खातच राहाल पहा पाककृती
मुंबई ३ मे | दहीवडा उत्तर भारतातील लोकप्रिय पदार्थ आहे. नाश्त्याचा तो उत्तम स्रोत आहे . चटपटीत दही, खुसखुशीत वडे आणि रुचकर अश्या चटण्या याने हा वडा अजूनच खमंग होतो . मग बघा त्याची साहित्य आणि कृती खालीलप्रमाणे
साहित्य:
- १/२ कप उडदाची डाळ
- १/४ कप मुगाची डाळ
- मीठ चवीप्रमाणे
- दह्याचे १ १/२ कप पात्तळ ताक
- १ १/२ कप घट्ट दही
- साखर २ ते ३ टीस्पून
- मीठ १/२ ते ३/४ टीस्पून
- १/२ टीस्पून आले पेस्ट/ किसलेले आले
- १ टेबलस्पून धने-जिरे पूड
- १ टीस्पून लाल तिखट
- १ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
- चिंचेची गोड चटणी आणि पुदिन्याची तिखट चटणी (आवडीप्रमाणे)
कृती:
१. उडदाची डाळ आणि मुगाची डाळ ४-५ तास पाण्यात भिजत घाला. भिजलेल्या डाळी एकत्र करून पाणी न घालता बारीक वाटून घ्या. मीठ घालून ढवळून घ्या. मिश्रणात गरज वाटली तर अगदी किंचित (१ ते २ चमचे) पाणी घाला.
२. एकीकडे दह्याचे पात्तळ ताक करून घ्या.
३. घट्ट दही घोटून घ्या. त्यात मीठ साखर आणि आल्याची पेस्ट घाला. अगदी थोडेसे पाणी घालून थोडेसे पात्तळ करून घ्या. दही फ्रीज मध्ये ठेवून द्या.
४. कढईत तेल गरम करा. एका पातेल्यात गार पाणी घालून ठेवा.मध्यम आचेवर गोल्डन ब्राऊन रंगावर मध्यम आकाराचे वडे तळून घ्या वड्यांचा आकार खूप मोठा ठेवू नका.
५. तळलेले वडे लगेचच गार पाण्यात घाला. ३-४ च्या बॅच मध्ये वडे तळून घ्या. दुसरी बॅच तळून होईपर्यंत आधीचे वडे पाण्यातच ठेवा.पाण्यात भिजल्यावर वड्याचा रंग फिक्कट होईल आणि वडे थोडेसे फुगून आकार मोठा होईल.वडे पाण्यातून काढताना किंचित पिळून पाणी काढून टाका आणि मग हे वडे ताकात भिजत घाला.
६. साधारण तास-दोन तास वडे ताकात भिजत फ्रीज मध्ये ठेवा.
७. सर्व्ह करताना, बाऊलमध्ये ताकातले वडे ठेवा. वरती घोटून ठेवलेले दही घाला. त्यावर धने-जिरेपूड, लाल तिखट चिमटीने घाला. आवडत असल्यास चिंचेची आणि पुदिन्याची चटणी घाला.कोथिंबीर घालून थंडगार दहीवडे सर्व्ह करा.
News English Summary: Dahiwada is a popular dish in North India. It is a great source of breakfast. Spicy curd, crispy wada and delicious chutneys make this wada even more delicious. Then look at its material and action as follows
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार