22 November 2024 1:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO
x

नंदिग्राममध्ये पुन्हा मतमोजणी झाल्यास आपल्या जीवाला धोका असल्याचं तिथल्या रिटर्निंग ऑफिसनं भीती व्यक्त केली होती - ममता बॅनर्जी

Mamata Banerjee

कोलकत्ता ०३ एप्रिल | रविवारी ५ राज्यांचे निकाल जाहीर झाले, परंतु संपूर्ण देशाचे लक्ष फक्त पश्चिम बंगालमधील चुरशीच्या लढाईवर होते. अपेक्षेप्रमाणे बंगालमध्ये निकालामध्येही ‘खेला’ झाला. राज्याच्या एकूण २९२ जागांपैकी तृणमूल काँग्रेसने प्रचंड बहुमत मिळवून २१४ जागा जिंकल्या, तर राज्यात पहिले भगवे सरकार स्थापन करण्याचा दावा करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला ७६ जागांवर समाधान मानावे लागले. परंतु, आता ममता बॅनर्जी यांनी देशभरातील भाजप विरोधकांना एकत्र आणण्याचा चंग बांधल्याचं दिसतंय.

दरम्यान, ममता बॅनर्जींच्या तृणमूलनं राज्यात दोनशेपेक्षा जास्त जागा जिंकल्या असल्या तरी खुद्द ममतांना मात्र नंदिग्राममध्ये पराभूत व्हावं लागलं. याबद्दल ममता यांनी एक धक्कादायक दावा केला. ‘नंदिग्राममध्ये पुन्हा मतमोजणी झाल्यास आपल्या जीवाला धोका असेल, अशी भीती तिथल्या रिटर्निंग ऑफिसनं व्यक्त केली होती. मला एसएमएसच्या माध्यमातून ही माहिती समजली. तिथला सर्व्हर चार तास डाऊन होता,’ असं बॅनर्जी म्हणाल्या.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी राज्यातील सध्याच्या घटनांवरून शांततेचं आवाहन केलं आहे. त्याचबरोबर कोरोनाशी लढाई ही आपली प्राथमिकता असल्याचंही त्यांनी म्हटलंय. विजयानंतर उद्धव ठाकरे, नवीन पटनायक, रजनीकांत, अखिलेश यादव अरविंद केजरीवाल, कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी अभिनंदनासाठी फोन केले. परंतु, पंतप्रधान मोदींनी अद्याप फोन केला नसल्याचं ममता बॅनर्जी म्हणाल्या.

कोरोनाचा प्रादुर्भाव शमल्यानंतर आम्ही सर्व मिळून काम करु. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि लोकांच्या मुद्द्यांवर मिळून काम करु इच्छित आहोत. पण एका हाताने टाळी कधी वाजत नाही, अशा शब्दात ममता बॅनर्जी यांनी सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांना आवाहन केलं आहे. तसंच हे वक्तव्य करुन त्यांनी भारतीय जनता पक्षाविरोधात रणशिंग फुंकल्याचं पाहायला मिळत आहे.

 

News English Summary: Although Mamata Banerjee’s Trinamool won more than 200 seats in the state, Mamata herself had to lose in Nandigram. Mamata made a shocking claim about this. The returning office in Nandigram had expressed fears that a recount would endanger his life. I got this information through SMS. The server was down for four hours, ‘said Banerjee.

News English Title: Mamata Banerjee made a shocking claim that the he returning office in Nandigram had expressed fears that a recount would endanger his life news updates.

हॅशटॅग्स

#MamtaBanerjee(63)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x