23 November 2024 8:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

सुजय यांनी व्हीडिओ चित्रित करण्याचा नाटकीपणा केला, मी कसं स्वत:चं वजन वापरलं हा दिखाऊपणा केला - न्यायालय

Sujay Vikhe Patil

मुंबई, ०४ मे | एखादी चांगली गोष्ट करण्यासाठी गैरमार्गाचा वापर झाला असेल तर त्या कृतीमागचा हेतू हा कधीच शुद्ध राहत नाही, अशा शब्दांत हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने भारतीय जनता पक्षाचे खासदार सुजय विखे-पाटील यांच्यावर कडक शब्दात ताशेरे ओढले. सुजय विखे-पाटील यांनी परस्पर रेमडेसिविर इंजेक्शन्सचा साठा खरेदी केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सोमवारी हायकोर्टाच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

यावेळी सुजय विखे-पाटील यांच्या वकिलाने युक्तिवाद करताना म्हटले की, माझ्या अशिलाची कृती ही कोणत्याही अंगाने गुन्हेगारी प्रकारात मोडत नाही. लोकांची मदत करण्यासाठी त्यांनी चार्टर्ड विमानाने परस्पर रेमडेसिविर इंजेक्शन्स आणली. मला मान्य आहे की, हे फाजील धाडस होते, परंतु हा गुन्हा ठरत नाही, असा बचाव सुजय-विखेंच्या वकिलांनी केला.

यावर न्यायमूर्तीनी म्हटले की, “सुजय विखे हे प्रतिष्ठित व्यक्ती आहेत. ते एक न्यूरोसर्जन आहेत. त्यांचे डॉ. विखे-पाटील स्मृती रुग्णालय एका रात्रीत मोठी झालेली संस्था आहे, असे चित्र उभे करण्याचा प्रयत्न होत असल्याचे सुजय-विखे यांच्या वकिलांनी म्हटले.

त्यावर न्यायमूर्ती घुगे यांनी खडे बोल सुनावले. तुमच्या अशिलाला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. विमानातून उतरल्यानंतर रेमडेसिविर इंजेक्शन्स उतरवताना व्हीडिओ चित्रित करण्याचा नाटकीपणा त्यांनी करायला नको होता. मतदारसंघांमधील लोकांसाठी मी कशाप्रकारे स्वत:चे वजन वापरून दिल्लीतून इंजेक्शन्स आणली, हे सांगण्याचा दिखाऊपणा त्यांनी टाळायला पाहिजे होता, असे न्यायमूर्ती घुगे यांनी म्हटले.

 

News English Summary: The Aurangabad bench of the High Court slammed Bharatiya Janata Party (BJP) MP Sujay Vikhe-Patil, saying the motive behind the act was never pure if it was used for a good cause. A petition was filed against Sujay Vikhe-Patil for purchasing stocks of mutual remedivir injections. The petition was heard before a High Court bench on Monday.

News English Title: A petition was filed against Sujay Vikhe Patil for purchasing stocks of mutual remedivir injections heard before a High Court bench news updates.

हॅशटॅग्स

#Maharashtra(207)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x