22 November 2024 10:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

कोरोनाबाबत मोदी सरकारकडे दूरदृष्टीचा अभाव आणि गाफीलपणा भोवला, रघुराम राजन यांनी सुनावले

Raghuram Rajan

मुंबई, ०४ मे | देशात कोरोना महामारीची लाट येऊन १५ महिने उलटले आहे. दरम्यान, देशात कोरोना महामारीचा प्रार्दुभाव झपाट्याने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर ऑक्सिजन, बेड, व्हेंटिलेटर आणि अत्यावश्यक औषधांचा तुटवडा भासत आहे. विशेष म्हणजे भारतात १५ महिन्यांच्या कोरोनाकाळात एकूण रुग्णांची संख्या २.०२ कोटी झाली आहे. यापैकी १.६६ कोटी कोरोनामुक्त झाले आहेत. ३५ लाखांवर उपचार सुरू आहेत. २.२२ लाख लोकांचा मृत्यू झाला.

कोरोना महामारीचा हा वेग थांबला नाही तर याच महिन्यात आकडा ३ कोटींवर जाणार असल्याची शक्यता तज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. देशात १८ एप्रिलनंतर नवे रुग्ण सापडण्याचा वेग वाढला असून तो कायम आहे. दररोजच्या रुग्णांचा आकडा ४ लाखांना स्पर्श करून आला आहे. १८ एप्रिलला संख्या २ लाख होती.

एकाबाजूला रुग्णसंख्या वाढत असताना दुसऱ्या बाजूला आरोग्य सुविधा संबधित यंत्रणा अपुरी असल्याचं स्पष्ट झालं आहे. देशात सर्वच इस्पितळांमध्ये ऑक्सिजन, रेमडीसीवीर इंजेक्शन आणि लसींचा प्रचंड तुटवडा असल्याने अनेक रुग्ण प्राण गमावत आहेत. या पार्श्वभूमीवर माजी गव्हर्नरांनी मोदी सरकारवर नाराजी व्यक्त करत कठोर शब्दांत टीका केली आहे. कोरोनाबाबतीत दूरदृष्टीचा अभाव आणि गाफीलपणा केंद्र सरकारला नडला, असा घणाघात करण्यात आला आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेबाबत सरकार आधीपासूनच सतर्क राहिले असते, तर त्यांनी तसे नियोजन केले असते. मात्र, दुसऱ्या लाटेबाबत गाफील राहिल्यामुळेच कोरोनाचा देशात कहर झाला आहे. सरकारमधील कमकुवत नेतृत्व आणि दूरदृष्टीचा अभाव यामुळे कोरोच्या दुसऱ्या लाटेने देशात मोठे नुकसान केले, अशी कठोर टीका रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी केली आहे.

सरकारमधील कोणी जगाकडे लक्ष दिले असते, इतरत्र कोरोनाची काय परिस्थिती आहे, हे पाहिले असते, तर कदाचित भारतात वाईट स्थिती ओढवली नसती, असेही राजन यांनी म्हटले आहे. ब्राझीलमधल्या परिस्थितीतून बोध घेऊन सरकारने आणखी तयारीनिशी सज्ज रहाणे आवश्यक होते, असा सल्ला राजन यांनी दिला आहे.

 

News English Summary: Former RBI governors Raghuram Rajan have expressed displeasure over the Modi government and harshly criticized it. Lack of foresight and indifference towards Corona has been blamed on the central government.

News English Title: Former governor of RBI Raghuram Rajan criticized Modi govt policy over corona pandemic news updates.

हॅशटॅग्स

#Raghuram Rajan(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x