22 November 2024 9:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Health First | नाकावरील ब्लॅकहेड्स नाहीसे करण्यासाठी करा हे घरगुती उपाय

home remedies for nose blackheads

मुंबई ५ मे :ब्लॅकहेड्स म्हणजे चेहऱ्यावरील सौंदर्यावर एक डागच. ब्लॅकहेड्स काढण्यासाठी कितीतरी उपाय केले जातात. कधी पार्लरमध्ये जाऊन हजारो रूपये खर्च करून ब्लॅकहेड रिमूव्हर नीडलाचा वापर केला जातो. तर कधीतरी खूपच त्रास सहन करावा लागतो. कितीही प्रयत्न केला तरीही हे ब्लॅकहेड्स पूर्णपणे जात नाहीत. धूळ, माती, प्रदूषण, खाण्यापिण्याच्या पद्धतीमध्ये बदल आणि शरीरातील हार्मोनल बदल यामुळे चेहऱ्यावर येणारे हे ब्लॅकहेड्स संपूर्ण चेहऱ्याचं सौंदर्य बिघडवतात. तुम्ही तुमच्या घरीच यावर सहज आणि सोपे उपाय करू शकता.

कसे दूर कराल ब्लॅकहेड्स ?
ब्लॅकहेड्सचा त्रास कमी करण्यासाठी प्रत्येक वेळेस महागड्या ब्युटी ट्रीटमेंटची गरज नसते. काही वेळेस घरगुती उपायांनीही ब्लॅकहेड्सचा त्रास कमी करता येऊ शकतो.

बेकिंग सोडा –
बेकिंग सोड्यामध्ये गुलाबपाणी किंवा साधं पाणी मिसळा. ही पेस्ट नाकावर लावा. किंवा ज्या ठिकाणी ब्लॅकहेड्सचा त्रास असेल तेथे ही पेस्ट लावा. पेस्ट सुकल्यानंतर पॅक खेचून काढा किंवा बोटांनी थोडा रगडा.

चारकोल पॅक –
अ‍ॅक्टिव्हेटेड चारकोल आणि त्वचेला पुरक अशा पिल ऑफचं मिश्रण बनवा, चेहर्‍यावर हा पॅक लावल्यानंतर काही वेळ सुकू द्यावा. 15-20 मिनिटांनी हा पॅक खेचून काढल्यास रातोरात ब्लॅकहेड्स आणि मृत पेशींचा थर निघून जातो.

टुथब्रश
अनेकजण जुने झालेले टुथब्रश फेकून देतात किंवा घरात इतर वस्तू स्वच्छ करायला त्याचा वापर करतात. मात्र नाकावरील ब्लॅकहेड्सचा त्रास कमी करण्यासाठी टुथब्रश मदत करतो.

मध आणि साखर
साखर हे उत्तम स्क्रबर आहे. साखर आणि मधाचं मिश्रण बनवून नाकावर रगडल्याने ब्लॅकहेड्सचा त्रास कमी होण्यास तसेच त्वचा मुलायम होण्यास मदत होते.

News English Summary: Blackheads are just a stain on the beauty of the face. No matter how hard you try, these blackheads don’t go away completely. Dust, dirt, pollution, changes in eating habits and hormonal changes in the body, these blackheads on the face spoil the beauty of the whole face. You can do this easily and simply at home.

News English Title: Do home remedies for removing nose blackheads news update article

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x