24 November 2024 11:52 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Apollo Micro Systems Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: APOLLO Post Office Interest | पोस्टाच्या 'या' 9 योजनांवर मिळते धमाकेदार व्याज, 10 रुपयांपासून देखील सुरू करू शकता गुंतवणूक Mutual Fund SIP | एक फॉर्म्युला तुमचं आयुष्य बदलू शकतो; कोटींच्या घरात कमवाल पैसे, म्युच्युअल फंड SIP ठरेल फायद्याची Home Loan | आधीच घरासाठी लोन घेतलं; दुसऱ्या घरासाठी देखील लोन प्रोसेस करायची आहे, असा मिळेल टॉप अप होम लोन FD Calculator | पत्नीच्या नावे FD करून मिळवा जास्तीत जास्त व्याज; FD कॅल्क्युलेटरचा फंडा काय सांगतो पहा - Marathi News SIP Calculator | आता सहज कमवता येतील 5 कोटी, गुंतवणुकीची 'ही' चाल बनवेल कोट्याधीश, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL
x

राज्यात भाजप नेत्यांच्या सर्व मागण्या राज्यपालांकडे, राज्याने एक मागणी केंद्र व राष्ट्रपतींकडे करताच भाजपचा तिळपापड?

Maratha reservation

मुंबई, ५ मे | मराठा समाजाने जो संयम आणि शांतता आजवर दाखवली तीच पुढेही दाखवावी, सरकारवर विश्वास ठेवावा, ही लढाई सरकार जिंकून दाखवेल, तुमचा न्यायहक्क तुम्हाला मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेला संबोधित केलं. यावेळी ते बोलत होते. मराठा नेत्यांनी, समाजाने शांतपणे हा निर्णय ऐकला, त्याबद्दल त्यांचे हात जोडून धन्यवाद असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी छत्रपती संभाजी राजे यांचा विशेष उल्लेख केला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, मराठा आरक्षण प्रकरणी जास्त वेळ न घालवता केंद्र सरकारने निर्णय घ्यावा, आता या माध्यमातून मी विनंती करत आहे, उद्या पत्र देखील लिहिणार आहे. जर गरज असेल तर आम्ही तिथे येऊन चर्चा करण्याची तयारी आहे.

एका प्रकारे सुप्रीम कोर्टाने हा निकाल देताना मार्गदर्शन केले आहे. यावेळी आता कुठे न्याय मिळेल हे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण देण्याचा अधिकार हा केंद्र सरकार आणि राष्ट्रपतींना असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेऊन मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यावे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याबाबत मी सकाळी दिलेल्या निवेदनामधून पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना आवाहन केले आहे. मात्र आता आरक्षणाच्या या मागणीसाठी मी उद्या पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना पत्र लिहिणार आहे. तसेच गरज भासल्यास आरक्षणाच्या या मुद्द्यावर मी पंतप्रधान आणि राष्ट्रपतींचीही भेट घेईन असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

दरम्यान, राज्यात सरकार असताना देखील सर्व मागण्या आणि विनंती पत्र घेऊन वेळोवेळो राज्यपालांना भेटण्याचा विक्रम रचणाऱ्या भाजप नेत्यांचा सध्या मुख्यमंत्र्यांच्या केंद्र आणि राष्ट्रपतींना केलेल्या एका विनंतीवरून जळफळाट झाल्याचं पाहायला मिळतंय. वास्तविक ज्याचा उल्लेख सर्वोच्च न्यायालयाने स्वतः केला आहे, त्याबाबतच मुख्यमंत्र्यांनी पुढचं पाऊल उचललं आहे. नेमका काय तिळपापड झाला आहे भाजप नेत्यांचा ते पहा;

 

 

News English Summary: Even when there is a government in the state, the BJP leaders, who have set a record of meeting the Governor from time to time with all the demands and request letters, are now seen to be overwhelmed by a request made by the Chief Minister to the Center and the President. In fact, the Chief Minister has taken the next step in the matter mentioned by the Supreme Court itself. Look at what exactly has happened to the BJP leaders.

News English Title: BJP leaders angry after CM Uddhav Thackeray request to PM Narendra Modi regarding Maratha reservation news updates.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x