22 November 2024 1:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO
x

महाराष्ट्रासाठी कर्नाटकातून येणारा ऑक्सिजन केंद्र सरकारने थांबवला - आरोग्यमंत्री

Maharashtra corona pandemic

मुंबई, ०६ मे : राज्यातील कोरोनास्थिती आव्हानात्मक आहे. त्यातच आरोग्य यंत्रणेवर देखील मोठा ताण आहे. अगदी लसींपासून ऑक्सिजनच्या पुरवठ्यापर्यंत सगळ्याच गोष्टींचा तुटवडा आहे. या गंभीर स्थिती केंद्र सरकारकडून राज्याला ऑक्सिजन पुरवला जात असताना आता राज्य सरकारपुढे एक अडचण निर्माण झाली आहे. कारण, केंद्राकडून महाराष्ट्रात येणारा ५० मेट्रीक टन ऑक्सिजन साठा कर्नाटकातच रोखण्यात असल्याची माहिती समोर आली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे या संपूर्ण प्रकाराविषयी बोलताना म्हणाले की, “कर्नाटकात ऑक्सिजन थांबवण्याचा निर्णय हा केंद्राचा आहे. मात्र, या पद्धतीने लिक्विड ऑक्सिजनचा राज्याचा कोटा कमी करणे योग्य नाही. आजच्या आजच आम्ही याबाबत केंद्र सरकारकडे अपील करणार आहोत”, असे म्हणत राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना राज्य सरकारची याबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे. दरम्यान, या प्रकारामुळे राज्यातील सांगली, कोल्हापूरसारख्या प्रमुख जिल्ह्यांसमोरचे आव्हान वाढणार आहे.

मिळालेल्या वृत्तानुसार, कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुराप्पा यांनी केंद्र सरकारला सांगून महाराष्ट्राला होणारा ५० मेट्रीक टन ऑक्सीजन पुरवठा थांबवला आहे. सांगली, कोल्हापूरसारख्या प्रमुख जिल्हे आणि आसपासच्या परिसरांतील आरोग्य यंत्रणांना ह्याचा फटका बसणार आहे.

 

News English Summary: It has come to light that 50 metric tons of oxygen coming to Maharashtra from the Center is blocked in Karnataka. State Health Minister Rajesh Tope has reacted while talking to the media.

News English Title: Modi govt has stopped the supply of oxygen coming from Karnataka state to Maharashtra said health minister Rajesh Tope news updates.

हॅशटॅग्स

#RajeshTope(27)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x