29 April 2025 5:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Share Price | मल्टिबॅगर शेअर पुन्हा पटरीवर, तज्ज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राईस, अपडेट नोट करा - NSE: IRFC Yes Bank Share Price | पेनी स्टॉकबाबत अलर्ट, गुंतवणूकदारांनी शेअर BUY, SELL की Hold करावा? - NSE: YESBANK Adani Power Share Price | अदानी ग्रुप शेअरची अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर; स्टॉकला BUY रेटिंग - NSE: ADANIPOWER IREDA Share Price | सरकारी कंपनीच्या स्टॉकबाबत महत्वाचा सल्ला, गुंतवणूकदारांना एक्झिटचा सल्ला - NSE: IREDA NTPC Green Energy Share Price | पीएसयू शेअर अत्यंत स्वस्त, खरेदी करून ठेवा, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN Reliance Power Share Price | 41 रुपयांचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी दिले महत्वाचे संकेत - NSE: RPOWER
x

शरीरातील ऑक्सिजन पातळीचं प्रमाण किती खाली घसरल्यावर चिंताजनक समजत आहात? - एम्सने दिली माहिती

AIIMS Dr Randeep Guleria

नवी दिल्ली, ०७ मे | कोरोना व्हायरसच्या महामारीनं देशात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे हॉस्पिटलमध्ये बेड्स आणि ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. डबल म्यूटेंट कोरोना व्हेरिएंटने श्वास घेण्याची समस्या सर्वाधिक उद्भवत आहे. सर्व रुग्णांना ऑक्सिजन देणं गरजेचे नाही परंतु एका रुग्णाला कोणत्या स्थितीत हॉस्पिटलमध्ये जावं लागतं हे जाणून घेऊया.

ऑक्सिजन सॅच्यूरेशन काय आहे? ऑक्सिजन सॅच्यूरेशन फुस्फुस आणि इतर शरीराला जाणारं रक्तातील हिमोग्लोबिन पातळी वाढवतं. शरीरातील यंत्रणा सुरळीत करण्यासाठी मदत करतं. रिडिंगमध्ये ९४ पेक्षा जास्त पातळी असणारे धोक्याचे बाहेर असतात असं सांगितलं जातं. कोरोना झाल्यानंतर शरीरातील ऑक्सिजन पातळी वेगाने कमी होते.

दरम्यान, या पार्श्वभूमीवर एम्स रुग्णालयाने मोठी माहिती दिली आहे. शरीरातील ऑक्सिजनची पतळी ही 92 ते 93 टक्क्यांपर्यंत जाणे हे चिंताजनक नाही, असं अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेतील (AIIMS) डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी म्हटलं आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात रणदीप गुलेरीया यांनी शरीरातील ऑक्सिजन पातळीबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. त्यांनी यामध्ये व्यक्तीच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळई ही 92 किंवा 93 पर्यंत गेल्यानंतर काळजी करण्याचे कारण नाही. उलट घाबरुन न जाता शरीरातील ऑक्सिजनची पातळी 93 पर्यंत खाली आली म्हणजे रुग्णाला उपचारासाठी रुग्णालयात वेळेवर दाखल करण्याचे हे निदर्शक समजावे, असे त्यांनी म्हटलंय.

यावेळी रणदीप गुलेरीया यांनी देशात ऑक्सिजनची कमतरता भासत असून त्याचा जपून वापर करणे गरजेचे असल्याचे सांगितले. तसेच भविष्यात आपल्याला गरज पडेल म्हणून काही व्यक्ती ऑक्सिजन सिलिंडर आपल्या घरात लपवून ठेवत असल्याचे समोर आले आहे. सध्याच्या महामारीच्या काळात ऑक्सिजन अशा प्रकारे लपवून ठेवणे चुकीचे असल्याचेसुद्धा त्यांनी म्हटले आहे. तसेच शरीरामध्ये ऑक्सिजनची पातळी 94 किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर चिंता करु नये. तुमच्या शरीरात 94 टक्के ऑक्सिजन असेल तर तो पुरेसा आहे. त्यामुळे शरीरात ऑक्सिजन नॉर्मल असूनसुद्धा तो वापरला तर ज्या रुग्णांच्या शरिरात 90 ते 80 टक्क्यांपर्यत ऑक्सिजन आहे; त्यांना वेळेवर ऑक्सिजन भेटण्यास अडचणी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचेही ते म्हणाले.

 

News English Summary: AIIMS Hospital has provided great information. It is not a matter of concern that the oxygen level in the body goes up to 92 to 93 percent, said Dr. Randeep Guleria of the All India Institute of Medical Sciences (AIIMS).

News English Title: It is not a matter of concern that the oxygen level in the body goes up to 92 to 93 percent said Dr Randeep Guleria news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या