Health First | जाणून घ्या अर्धशिशीवर ( मायग्रेन )आहेत काही घरगुती उपचार
मुंबई ८ मे : डोकेदुखी हा आजार वेगवेगळ्या पद्धतीचा असतो. जीवनशैलीमुळे होणारा त्रास म्हणजे मायग्रेन त्यालाच आपण अर्धी डोकेदुखी म्हणतो. अमेरिकेतील प्रत्येकी पाच महिलांपैकी एका महिलेला त्रास होतो तर यूकेमध्ये चार पैकी एक महिलेला मायग्रेनने त्रस्त केले आहे. भारतामध्ये ह्या मायग्रेनचा त्रास बर्याच लोकांमध्ये आढळतो. पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये ह्याचे प्रमाण जास्त असते. हा आजार साधारणत: 20 ते 45 वयोगटातल्या लोकांना जास्त प्रमाणात होतो. 50 वर्षांवरील वयाच्या लोकांना हा होत नाही. हा त्रास उच्चभ्रू लोकांना जास्त होतो. फिल्डमध्ये 25 टक्के मुलांमध्ये हा त्रास असतो. असा जीवघेणा हा त्रास आहे. हा आजार ठीक करण्यास त्रासदायक असून ही एक जागतिक समस्या आहे. परंतु ह्यावर निश्चित उपचार उपलब्ध नाही. आयुर्वेदाने ह्याचा उपचार शक्य आहे.
कारणे हेतू: आतापर्यंत जे काही ह्या आजारावर संशोधन झाले आहे, त्यानुसार ह्या आजाराचे निश्चित कारण किंवा तपासणी सांगता येत नाही. परंतु खाली दिलेली काही कारणे ह्या आजाराला उत्पन्न करतात.
1. अवेळी जेवण भूक नसताना जेवणे व उपवास.
2. अनियमित झोप, अति झोप, कमी झोप.
3. अति प्रवास.
4. जेवण करताना जास्त पाणी पिणे
5. spicy जेवण नियमित घेणे.
6. pain killers चा अधिक वापर (रुग्ण स्वत: मनाने करतात)
7. कुटुंबनियोजनार्थी वापरण्यात येणारी औषधी, हार्मोन्स थेरपी इत्यादी.
8. hereditary
9. सूर्यप्रकाशात जास्त फिरणे.
10. चिंता, कामाची घाई.
11. पचायला जड पदार्थ खाणे
12. मनात नेहमी छोटया गोष्टींचा विचार करत राहण्याची सवय.
मायग्रेनसाठी (डोकेदुखी) घरगुती उपाय
- ताज्या आणि हिरव्या पालेभाज्यांमध्ये मॅग्निशियम मोठ्या प्रमाणावर असते. हे रसायन अर्धशिशीसारखा विकार चुटकीसरशी घालवतात. गव्हामध्येही मॅग्निशियम असते. हा विकार झालेल्यांनी आहारात जास्तीतजास्त गव्हाचा वापर करायला हवा.
- जेवणात मासे असणे चांगले. कारण त्यात ओमेगा-३ हे फॅटी अॅसिड आणि भरपूर व्हिटॅमिन्स असतात. अर्धशिशीमुळे होणारा त्रास मासे खाण्यामुळे बर्याच प्रमाणात कमी होऊ शकतो.
- साय नसलेले दूध प्यायल्यानेही किंवा दुधापासून बनविलेले कोणतेही पदार्थ खाल्ल्याने या विकारावर चांगला फायदा होतो. दुधात व्हिटॅमिन-बी भरपूर असते. त्याला रायबोफ्लेविन असंही म्हटलं जातं. शरीरातील पेशींना ते ऊर्जा देण्याचं काम करतात. पेशींना ऊर्जा मिळाली नाही की अर्धशिशी होऊ शकते.
- अर्धशिशी सुरू झाली की लगेच गरगमागरम कॉफी प्यायलाच हवी. कॉफीमधील रसायनामुळे हा विकार नाहीसा होतो.
- बाजरीमध्ये फायबर, अॅन्टीऑक्सिडंट आणि मिनरल असतात. त्यामुळे या विकारावर बाजरी आहारात असणेही गरजेचे आहे.
- आलं खाल्ल्यामुळेही अर्धशिशी पळून जाते. आहारात आल्याचा वापर करायलाच हवा.
- धन्याचे पाणी प्याल्यानेही मायग्रेनचा त्रास कमी होतो.
- ध्यानधारणा, दीर्घश्वसन केल्यानेही ह्यात आराम मिळतो.
- रात्री जागरण टाळावे.झोपताना टी. व्ही. बघू नये, शिवाय ह्या रुग्णांनी नेहमी अंधारमय खोलीतच झोपावे.
- सकाळी 4 वाजता उठून जिलेबी 2 वेडे व दूध पिऊन झोप घ्यावी. ह्याने डोकेदुखी बंद होते.
- खोबर्याच्या तेलाने हळूवार मालिश करावी.
- पत्ताकोबीच्या पानाने मानेला व डोक्याला बांधून ठेवल्यानेही हा त्रास कमी होतो.
News English Summary: Headaches come in different forms. Lifestyle problems are migraines, which we call half-headaches. One in five women in the United States suffers from migraines, while one in four women in the UK suffer from migraines. Migraine is a common problem in India.
News English Title: Do home remedies for migraine news update article
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार