25 November 2024 9:37 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

कोरोना आपत्ती | देशात मागील 24 तासातील 4,091 रुग्णांचा मृत्यू

India corona pandemic

नवी दिल्ली, ०९ मे | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार माजला आहे. दिवसेंदिवस वाढणारी कोरोना रुग्णसंख्या धडकी भरवणारी आहे. याच पार्श्वभूमीवर, केंद्रीय आरोग्यमंत्रालयाने आज (९ मे) जारी केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या २४ तासांत ४ लाखांहून अधिक नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर याच एका दिवसातला कोरोनामुळे मृत पावलेल्यांचा आकडा आजही ४ हजारांच्या पार गेला आहे.

केंद्रीय आरोग्यमंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत देशात ४ लाख ३ हजार ७३८ नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर आणखी एक चिंताजनक बाब म्हणजे याच एका दिवसात सर्वाधिक तब्बल ४ हजार ९२ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे.

देशातील कोरोनाची आकडेवारी:

  • मागील 24 तासातील नवीन रुग्णसंख्या: 4.03 लाख
  • मागील 24 तासातील मृत्यू: 4,091
  • मागील 24 तासात ठीक झालेले रुग्ण: 3.86 लाख
  • आतापर्यंतचे एकूण संक्रमित: 2.22 कोटी
  • आतापर्यंत ठीक झालेले रुग्ण: 1.83 कोटी
  • आतापर्यंत झालेले एकूण मृत्यू: 2.42 लाख
  • सध्या उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या: 37.32 लाख

15 राज्यात लॉकडाऊनसारखे निर्बंध
देशातील 14 राज्यांमध्ये पूर्ण लॉकडाउनसारखे निर्बंध लावण्यात आले आहेत. यात हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, छत्तीसगड, ओडिशा, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ आणि मिजोरम सामील आहेत.

 

News English Summary: The second wave of corona has caused havoc in the country. The increasing number of corona patients is alarming. Against this backdrop, according to figures released by the Union Health Ministry today (May 9), more than 4 lakh new patients have been registered in the last 24 hours. The number of deaths due to corona in a single day has crossed 4,000 even today.

News English Title: The number of deaths due to corona in a single day has crossed 4000 even today in India news updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x