22 November 2024 9:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

महाराष्ट्राला पुरेशा लसी मिळण्यासाठी देखील केंद्राला एखादं पत्र लिहा - आ. रोहित पवार

NCP MLA Rohit Pawar

पुणे, ०९ मे | राज्यात काल दिवसभरात 53 हजार 605 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर त्याचवेळी 82 हजार 266 रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. एकाच दिवसात इतक्या मोठ्या संख्येने रुग्ण कोरोनामुक्त होण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे राज्यासाठी हा खूप मोठा दिलासा आहे. मुख्य म्हणजे यामुळे अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा 6 लाख 28 हजार 213 इतका खाली आला आहे.

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. तर दुसरीकडे कोरोना लसींचा तुटवडा जाणवत आहे. यावर विरोधकांनी केवळ राजकीय टीका न करता राज्याला पुरेशा लसी कशा मिळतील यासाठी केंद्राला एखादं पत्र लिहावं, असा सल्ला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी दिला आहे. रोहित पवारांनी ट्वीट करत विरोधकांवर निशाणा साधला.

महाराष्ट्रावरील करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे निर्माण झालेलं संकट अद्यापही दूर झालेले नाही. असे असतानाही सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची आकडेवारी लपवली जात असल्याचा आरोप भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. या आरोपाला राष्ट्रवादीचे आमदार रोहीत पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले.

कोविडच्या लढ्याबाबत पंतप्रधान आणि सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्राचं कौतुक केलं, त्यामुळं राज्यातील विरोधकांनी केवळ राजकीय टीका न करता राज्याला पुरेशा लसी कशा मिळतील, यासाठी एखादं पत्र केंद्रालाही जरुर लिहावं!, असा टोला लगावत, आणि कोविडच्या मृतांची आकडेवारी लपवण्याबाबत बोलायचं तर आज हे भाजपशासित राज्यांना सांगण्याची खरी गरज आहे. कोविडचा हा लढा संपलेला नाही, त्यामुळं राजकीय टीका-टिप्पणी टाळून सर्वांनाच हा लढा एकत्रित लढावा लागणार आहे. त्यासाठी प्रयत्न करुयात!, असे आवाहन रोहित पवार यांनी ट्विटरवरून केले आहे.

 

News English Summary: The number of corona patients in Maharashtra is increasing day by day. Corona, on the other hand, is experiencing a shortage of vaccines. NCP MLA Rohit Pawar has suggested that the opposition should write a letter to the Center on how to get enough vaccines for the state without making political criticism. Rohit Pawar tweeted and targeted the opposition.

News English Title: NCP MLA Rohit Pawar has suggested that the opposition should write a letter to the Center on how to get enough vaccines for the Maharashtra news updates.

हॅशटॅग्स

#RohitPawar(75)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x