25 November 2024 8:07 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

कोरोना आपत्ती | नाशिकमध्ये 12 मे पासून 10 दिवसांचा कडक लॉकडाउन

Maharashtra corona pandemic

नाशिक, १० मे | नाशिक जिल्ह्यात वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर 10 दिवसांचा कडक लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. येत्या 12 मे रोजी 12 वाजल्यापासून 22 मे पर्यंत 10 दिवस जिल्ह्यातील मार्केट पूर्णपणे बंद पाडले जाणार आहे. या लॉकडाउनमध्ये जीवनावश्यक वस्तू आणि सेवा वगळता सर्व बंद राहणार आहे. नाशिक महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव यांनी सोमवारी सकाळी झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेतला आहे.

  1. जिल्ह्यात बुधवारपासून लागू होणाऱ्या नवीन नियमानुसार, सकाळी 7 ते 12 वाजेपर्यंत दूध विक्री सुरू राहील. याच कालावधीमध्ये भाजीपाला देखील विकता येईल. मात्र रस्त्यावर बसून विक्री करणाऱ्यांना परवानगी राहणार नाही. ज्यांची दुकाने आहेत ते दुपारी 12 वाजेपर्यंत सुरू ठेवू शकतील. हातगाडीवर फिरून भाजीपाला विक्री करणाऱ्यांना सुद्धा दुपारी बारा वाजेपर्यंतच विक्री करता येणार आहे.
  2. या व्यतिरिक्त जिल्ह्यातील शहरी भागांमध्ये सर्व बांधकामे बंद राहतील. जेथे कामगारांना राहण्याची सोय आहे अशाच ठिकाणी बांधकामांना परवानगी असेल. 10 दिवसांच्या कडक लॉकडाउनमध्ये मजुरांची ने-आण करता येणार नाही.
  3. लॉकडाउन काळात सर्व बाजार समित्या बंद राहतील. पेट्रोल पंपांवर सुद्धा केवळ अत्यावश्यक वस्तू आणि सेवा पुरवठा करणाऱ्यांनाच पेट्रोल दिले जाणार आहे. अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांना तसे गणवेश, ओळखपत्र गळ्यात ठेवावे लागणार आहे.
  4. वैद्यकीय सेवेशी संबंधित सेवा पूर्वीप्रमाणेच सुरू राहतील. लॅब, रुग्णालये आणि मेडिकलवरील कामगारांना ओळखपत्र बाळगावे लागणार आहेत.
  5. या व्यतिरिक्त अत्यावश्यक वस्तूंची होम डिलिव्हरी सुरू राहील. विशेष म्हणजे, किराणा दुकाने सुद्धा केवळ होम डिलिव्हरी करू शकतील. लोकांना भाजीपाला आणि किराणा घेण्यासाठी सुद्धा बाहेर पडता येणार नाही. अत्यावश्यक वस्तूंच्या डिलिव्हरीसाठी सकाळी 7 ते 12 अशी वेळ दिली आहे.

दरम्यान, दुसऱ्या लाटेमुळे देशात आणि राज्यात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली असून, विषाणू संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सुरूवातीला नाईट कर्फ्यू व नंतर संचारबंदी लागू केली होती. त्यानंतर निर्बंध कडक करण्यात आले. मात्र, त्यामुळे करोना रुग्णवाढीला ब्रेक लागला असला, तरी त्यामध्ये घट झालेली नाही. तर दुसरीकडे अनेक जिल्ह्यातील ग्रामीण भागातही करोनाचा संर्सग पोहोचल्यानं चिंता वाढली आहे.

 

News English Summary: A 10-day strict lockdown has been announced in Nashik district against the backdrop of increasing number of patients. The market in the district will be closed for 10 days from 12 noon on May 12 to May 22. The lockdown will shut down all but essential goods and services. Nashik Municipal Commissioner Kailas Jadhav has taken this decision after a meeting held on Monday morning.

News English Title: A 10 day strict lockdown has been announced in Nashik district against the backdrop of increasing number of patients news updates.

हॅशटॅग्स

#Nashik(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x