22 April 2025 9:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांच्या HRA मध्ये बदल होणार, हिशेबही नवीन बेसिक प्रमाणे, अपडेट जाणून घ्या EPFO Pension News | खाजगी कंपनी पगारदारांसाठी मोठी बातमी, EPFO ची महिना 7500 रुपये मिनिमम पेन्शन मिळणार SBI Mutual Fund | पगारदारांनो, बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 1 लाखांच्या गुंतवणुकीवर 1.27 कोटी परतावा मिळेल Horoscope Today | 22 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या HFCL Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या स्वस्त शेअर्सची जोरदार खरेदी, 5 दिवसात 12.59% तेजी - NSE: HFCL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 22 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

2 ते 18 वयोगटाच्या लसीकरणासाठी भारतातील तज्ज्ञांकडून कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या ट्रायल्सची शिफारस

India corona pandemic

नवी दिल्ली, १२ मे | देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल दोन कोटींचा टप्पा पार केला असून दोन लाख लोकांना आतापर्यंत कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनामुळे काही ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

दुसरीकडे सर्वकाही ठीक राहिल्यास लवकरच कॅनडा आणि अमेरिकेनंतर भारतात 2 ते 18 वयोगटासाठी कोरोनाची स्वेदशी लस तयार होईल. अधिकृत सूत्रांनी सांगितल्यानुसार, सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गेनायजेशन (CDSCO) च्या सब्जेक्ट एक्सपर्ट्स कमेटी (SEC) ने मंगळवारी भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या ट्रायल्सची शिफारस केली आहे. हे ट्रायल AIIMS दिल्ली, AIIMS पटना आणि मेडिट्रिना इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल साइंसेज नागपुरमध्ये 525 विषयांवर केले जातील. सब्जेक्ट एक्सपर्ट्स कमेटीने मंगळवारी हैदराबादमध्ये भारत बायोटेकच्या प्रस्तावावर विचार केला आहे.

प्रसार माध्यमांना प्राप्त झालेल्या माहितीनुसार, एक्सपर्ट्स कमेटीने कंपनीला तिसऱ्या फेजच्या ट्रायलसाठी CDSCO कडून परवानगी घेण्यापूर्वी, डेटा अँड सेफ्टी मॉनिटरिंग बोर्ड (DSMB) ला दुसऱ्या फेजचा सुरक्षा डेटा देण्याचे निर्देश दिले आहेत. यापूर्वी, 24 फेब्रुवारीला झालेल्या बैठकीत प्रस्तावावर विचार करण्यात आला आणि भारत बायोटेकला रिवाइज्ड क्लिनिकल ट्रायल प्रोटोकॉल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. तर यापूर्वीच, सोमवारी अमेरिकेच्या फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन (US-FDA) ने 12 ते 15 वर्षांच्या मुलांसाठी फायजर-बायोएनटेक (Pfizer-BioNTecch) च्या कोरोना लसीला परवानगी दिली आहे.

 

News English Summary: The Subject Experts Committee (SEC) of the Central Drugs Standards Control Organization (CDSCO) on Tuesday recommended the second and third trials of Bharat Biotech’s Covacin. The trials will be conducted on 525 subjects at AIIMS Delhi, AIIMS Patna and Meditrina Institute of Medical Sciences Nagpur.

News English Title: After the United States India will have an indigenous corona vaccine for the age group of 2 to 18 years news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या