22 November 2024 9:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Health First | जाणून घ्या कांद्याच्या सालींचे औषधी गुणधर्म

benefits of onion peels

मुंबई १२ मे : आपण सगळेच जण कांद्याची साले कचरा म्हणून फेकून देतो. कारण, आपल्याला त्याचे काही फायदे माहित नाहीत. होय, कांद्याच्या सालामध्ये पुष्कळ पोषक तत्त्वे आढळतात जे आपल्या आरोग्यासाठी तसेच त्वचेचे सौंदर्य वाढवण्यासाठी प्रभावी आहेत. त्याच बरोबर याचे आणखी काही फायदे आहेत, ते जाणून घेऊया…

व्हिटामिन ए, सी, ई आणि बरेच अँटीऑक्सिडेंट्सयुक्त असलेली कांद्याची साले अँटी-इफ्लेमेटरी गुणधर्मांनी परिपूर्ण आहेत. कांद्याच्या सालामध्ये क्वरेसेटीनचे प्रमाण जास्त असते, जे रक्तदाब कमी करण्यास आणि रक्तवाहिन्यांचे कार्य सुरळीत करण्यास उपयुक्त ठरते. यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.

1. बॅड कोलेस्ट्रॉल कमी होते:
आपल्या शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यात मदत होते. या साठी कांद्याचे साल रात्रभर पाण्यात भिजत ठेवून ते पाणी सकाळी प्यायचे आहे,हे चवीला चांगले नसते, म्हणून आपण हे मध किंवा साखर मिसळून देखील पिऊ शकता .दररोज हे प्यायल्याने निश्चितच फरक जाणवेल.

2. त्वचेच्या ऍलर्जीला दूर करते:
जर आपल्याला त्वचेच्या कोणत्याही गोष्टीची ऍलर्जी असेल तर वरील सांगितल्या प्रमाणे कांद्याच्या सालीचे पाणी बनवून ते पाणी दररोज त्वचेला लावून त्वचा स्वच्छ करावी.

3. केसांना सुंदर बनवते:
केसांना सुंदर बनविण्यासाठी अनेक कंडिशनर वापरता,तर आपण केसांना सुंदर बनविण्यासाठी कांद्याच्या पाण्याचा वापर करू शकता. या मुळे आपले केस मऊ आणि चमकदार होतील.

4. चेहऱ्यावरील डाग काढते:
या साठी कांद्याचे रसाळ साल वापरा. कांद्याच्या सालींमध्ये हळद मिसळून डाग असलेल्या जागी लावा.लवकरच आपल्याला फरक जाणवेल.

5. खराब घसा ठीक करतो:
एका अभ्यासानुसार, कांद्याच्या सालामध्ये मुबलक प्रमाणात फायबर आढळते. तसेच त्यात असलेले फ्लावोनोइड्स, क्वरेसेटीन आणि फिनोलिक हे घटक आपल्या शरीराची सूज आणि कर्करोगासारख्या समस्यांपासून संरक्षण करण्यासाठी खूप प्रभावी आहेत.

7.स्नायूंमधील वेदना कमी होतात:
जर, आपण दररोज झोपायच्या आधी कांद्याच्या सालाचे पाणी सेवन केले, तर पाय दुखणे आणि स्नायूतील वेदना कमी होण्यास मदत होते. यासाठी, आपल्याला कमी तापमानात कांद्याची साले किमान 15 मिनिटे उकळून घ्यायची आहे. दररोज रात्री एक कप हे पाणी प्यावे.

News English Summary: We all throw away the onion peel as garbage. Because, we don’t know some of its benefits. Yes, onion peel contains many nutrients that are effective for your health as well as skin beauty. Here are some of the benefits.

News English Title: Onion peels are beneficiary to our health news update article

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x