23 November 2024 4:07 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात ‘नमामि गंगे’ ऐवजी ‘शवामी गंगे’ असं झालं आहे | काँग्रेस खा. धानोरकरांचं टीकास्त्र

India corona pandemic

चंद्रपूर, १३ मे | देशात कोरोना रुग्णांमध्ये मागील 24 तासात पुन्हा वाढ झाली. बुधवारी 3 लाख 62 हजार 389 नवीन रुग्ण सापडले, तर 3 लाख 51 हजार 740 रुग्णांनी कोरोनावर मात केली. दरम्यान, बुधवारी 4,127 रुग्णांचा मृत्यू झाला. चार हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू होण्याचा हा सलग दुसरा दिवस आहे. देशात या महामारीच्या विळख्यात आतापर्यंत 2.37 कोटी लोक आले आहेत.

दुसरीकडे, देशातील उत्तरेकडील राज्य देखोल कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. त्यात बिहार आणि उत्तर प्रदेशात स्मशान भूमीत २-३ दिवसांचा वेटिंग लागत असल्याने कोरोना प्रेतातून दुर्गंधी पसरत असल्याचं देखील समोर आलं आहे. परिणामी बिहार आणि उत्तर प्रदेशातील कोरोना रुग्णांचे नातेवाईक धक्कादायक मात्र स्वीकारून स्वतःला मोकळे करत असल्याचं पाहायला मिळतंय. बिहार मधील गंगा नदीत जवळपास १०० मृत कोरोना बॉडी फेकल्याचं आढळून आलं आहे आणि अगदी तसाच प्रकार उत्तर प्रदेशातील गंगा नदीत देखील पाहायला मिळाला आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाला घाम फुटला होता.

आता या प्रकारावर महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्ला चढवलाय. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात ‘नमामि गंगे’ ऐवजी ‘शवामी गंगे’ झाल्याची टीका केलीय. गंगा नदीत आतापर्यंत शेकडो मृतदेह प्रवाहात वाहून आल्याचं गाझीपूर आणि बक्सरमध्ये दिसून आलं. त्यातील काही मृतदेह हे अर्धवट जळालेल्या अवस्थेत होते. त्यावरुन बाळू धानोरकर यांनी पंतप्रधान मोदींवर हल्ला चढवत भारताची मान शरमेनं खाली गेल्याचं म्हटलंय. हा संपूर्ण भारतवासियांचा जगभरात झालेला अपमान आहे. कोरोना विरोधी लढ्यात मोदी सरकारनं विरोधी पक्षांना आणि त्यांच्या सुचनांना सामावून घेण्याचं आवाहनही धानोरकर यांनी केलंय.

दरम्यान, मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यातील नदीत अनेक मृतदेह तरंगताना आढळून आले आहेत. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नांदापूर गावातील मुळची केन नदीची उपनदी असलेल्या रूंझ नदीत काही मृतदेह तरंगताना दिसत आहेत. हे मृतदेह कोरोनाग्रस्तांचे आहेत की नाही याबाबत माहिती नाही. परंतु असे प्रकार यापूर्वी घडले नसल्याचं गावकऱ्यांनी म्हटलं आहे. म्हणून आम्ही गावातील मुलांना नदीत वाहणारे मृतदेह बाहेर काढण्यास मनाई केली आहे. कारण यामुळे गावात कोरोनाचा प्रसार होऊ शकतो अशी आम्हाला भीती असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे. तसेच गावातील लोक यांच नदीचं पाणी हे पिण्यासाठी वापरतात.

 

News English Summary: Balu Dhanorkar, the only Congress MP from Maharashtra, has strongly attacked Prime Minister Modi. Prime Minister Modi’s leadership has been criticized as ‘Shawami Ganga’ instead of ‘Namami Ganga’. Hundreds of bodies have been washed away in the river Ganga so far in Ghazipur and Buxar.

News English Title: Congress MP Balu Dhanorkar criticized PM Narendra Modi over corona patients diabodies found in Ganga river news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x