19 April 2025 8:29 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल Horoscope Today | 19 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Infosys Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेल्या IT स्टॉकसाठी BUY रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: INFY IRFC Share Price | 129 रुपयाच्या शेअरसाठी 165 रुपये टार्गेट प्राईस, महत्वाची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC Reliance Share Price | कोटक सिक्युरिटीज बुलिश, जाहीर केली टार्गेट प्राईस, गुंतवणूकदारांसाठी अपडेट - NSE: RELIANCE
x

महाराष्ट्र सरकारची लस खरेदी निविदा मोदी सरकारने परवानगी न दिल्याने रखडली

India corona pandemic

मुंबई, १५ मे | देशातील १५ राज्यांत एक दिवसात बरे झालेल्या रुग्णांची संख्या नव्या रुग्णांच्या संख्येपेक्षा जास्त नोंदली गेली. या राज्यांत महाराष्ट्र, छत्तीसगड, मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाणा, बिहार, तेलंगण, पंजाब, आसाम, जम्मू आणि काश्मीर, हिमाचल, गोवा आणि चंदीगड यांचा समावेश आहे. देशात शुक्रवारी ३,३३,६०९ नवे रुग्ण आढळले. गुरुवारी ही संख्या ९,५३५ ने जास्त होती. बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या त्यापेक्षा जास्त म्हणजे ३,६३,२९४ राहिली. तथापि, मृत्यूचे आकडे वाढतेच आहेत. शुक्रवारी पुन्हा एकदा ४,०५० मृत्यूंची नोंद झाली. शुक्रवारी महाराष्ट्रातही नव्या रुग्णांच्या संख्येत घट दिसली.

दरम्यान, कोरोना साथीच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला असताना लशींचाही तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्य सरकारने लसखरेदीसाठी जागतिक निविदा काढण्याचा निर्णय घेतला असला तरी केंद्राने त्यास परवानगी दिली नसल्याने निविदा प्रक्रियाच रखडली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात शुक्रवारी त्याबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘जास्तीत जास्त लशी उपलब्ध होण्यासाठी जागतिक निविदा काढण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र, केंद्र सरकारने अद्याप परदेशी लस खरेदीसाठी राज्याला परवानगी दिलेली नाही. त्यामुळे जागतिक निविदा काढण्याची प्रक्रिया रखडली आहे.’’ जागतिक निविदा काढण्यासाठी महापालिकांना मात्र राज्य सरकारची परवानगी आवश्यक नसल्याचेही पवार यांनी या वेळी स्पष्ट के ले.

 

News English Summary: While the second wave of the Corona epidemic is raging, there is also a shortage of vaccines. Therefore, even though the state government has decided to issue a global tender for the purchase of vaccine, the tender process has stalled as the Center has not allowed it.

News English Title: Modi govt has not yet gave approval for Maharashtra Global tender of vaccine purchase news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या