23 November 2024 2:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, असं मिळेल रेल्वेचं सर्वांत स्वस्त तिकीट, ठाऊक आहे हा फंडा My EPF Money | EPF मधून पैसे काढण्याची सर्वांत सोपी पद्धत इथे पहा, खात्यातील जमा शिल्लक तपासून पैसे काढू शकता Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल Mutual Fund SIP | श्रीमंतीचा महामार्ग, 'या' भन्नाट फॉर्म्युल्याचा वापर करा, तुमचा मुलगा देखील 21 व्या वर्षी बनेल करोडपती HAL Share Price | डिफेन्स कंपनी HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HAL Smart Investment | श्रीमंतीच्या मार्गावर घेऊन जाणारा फॉर्म्युला आहे जबरदस्त; व्हाल 2 करोडचे मालक, खास इन्वेस्टमेंट टीप Penny Stocks | श्रीमंत करतोय हा पेनी शेअर, पैसा 7 पटीने वाढला, खरेदीनंतर संयम करेल श्रीमंत - Penny Stocks 2024
x

राज्याला अधिक मदत द्या असं फडणवीसांकडून मोदींना एकही पत्र नाही, पण सोनिया गांधींना पत्र लिहिण्यास वेळ काढला

Devendra Fadnavis

मुंबई, १५ मे | काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी गेल्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं होतं. देशात आलेल्या करोनाच्या दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवण्याच्या दृष्टीने काही मुद्दे उपस्थित केले होते. यामध्ये सोनिया गांधी यांनी काही लसींच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली जावी असं मत व्यक्त केलं होतं. यावेळी त्यांनी करोनाविरोधातील लढाईत परिणामकारक निकालासाठी लसीला प्राधान्य देण्याच्या धोरणाची गरजही अधोरेखित केली होती.

तसेच काँग्रेसचं सरकार असलेल्या राज्यांच्या प्रमुखांशी चर्चा केल्यानंतर सोनिया गांधी यांनी हे पत्र पाठवलं होतं. बैठकीत त्यांनी राज्यातील परिस्थिती तसंच लसींची उपलब्धता, व्हेटिंलेटर आणि औषधांच्या सुविधेची माहिती घेतली होती. बैठकीत पंजाब, राजस्थान आणि छत्तीसगडने आपल्याकडे लसींचा मर्यादित साठा असल्याचं सांगत केंद्राने तो पुरवठा वाढवावा अशी मागणी केली होती.

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाकाळात मोदी सरकारकडून अधिक मदत मिळावी यासाठी मोदींकडे किमान पत्राद्वारे कोणताही पाठपुरावा न करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिण्यासाठी वेळ काढल्याचं पाहायला मिळतंय. त्यावरून फडणवीसांना राज्याला केंद्रातून अधिक मदत कशी मिळेल यापेक्षा राजकारण करण्यातच रस असल्याचं सिद्ध होतंय. गडकरींनी आपत्ती काळात राजकारण न करण्याचा सल्ला देऊन सुद्धा राज्यातील नेते बदलण्यास इच्छुक नसल्याचं पाहायला मिळतंय.

काय आहे नेमकं पत्र;

 

News English Summary: Devendra Fadnavis, who did not follow up with Modi at least in a letter to get more help from the Modi government during the Corona era in Maharashtra, seems to have taken the time to write a letter to Congress Acting President Sonia Gandhi. This proves that Fadnavis is more interested in politics than how the state can get more help from the center. Even after Gadkari advised not to do politics in times of calamity, the state leaders are not willing to change.

News English Title: Opposition leader Devendra Fadnavis wrote a letter to congress president Sonia Gandhi news updates.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x