WHO'च्या शास्त्रज्ञाचा इशारा | भारतासाठी कोरोनाचं संकट मोठं, पुढील 6 ते 18 महिने चिंतेचे
नवी दिल्ली, १७ मे | करोनामुळे होत असलेल्या मृत्यूचं वादळ देशावर अजूनही घोंगावत असल्याचं चित्र आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार देशात गेल्या २४ तासांत दोन लाख ८१ हजार ३८६ नवीन करोनाबाधित आढळून आले असून, तीन लाख ७८ हजार ७४१ जण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. तर देशात याच कालावधीत ४ हजार १०६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील मृतांची एकूण संख्या २ लाख ७४ हजार ३९० वर पोहोचली आहे.
एकाबाजूला कोरोना रुग्णांवर उपचारांसाठी प्लाझ्मा थेरपीचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात असला तरी कोरोना संसर्गाचे गांभीर्य कमी करणे किंवा मृत्यू टाळण्यासाठी ही थेरपी फार लाभदायक ठरत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कोरोना उपचारांतील वैद्यकीय निर्देशांतून ही थेरपी काढून टाकली जाण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.
दुसरीकडे जागतिक आरोग्य संघटनेच्या वैज्ञानिकांनी भारतासाठी एक गंभीर इशारा दिला आहे. भारतात कोरोनाच्या आणखी बऱ्याच लाटा येण्याची शक्यता असून भारतासाठी 6 ते 18 महिने अत्यंत महत्त्वाचे असल्याचं जागतिक आरोग्य संगघटनेच्या एका शास्त्रज्ञाने सांगितलं आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामिनाथन यांनी द हिंदू या दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत ही शक्यता वर्तवली आहे. येणाऱ्या काळात भारतात कोरोनाच्या अनेक लाटा येऊ शकतात. त्यामुळे भारताच्या अडचणी वाढू शकतात. कोरोनाच्या लढाईत पुढील 6 ते 18 महिने भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत, असं सौम्या यांनी सांगितलं. या व्हायरसचा विकास कसा होतो, त्यावरही बरच काही अवलंबून आहे. व्हेरिएंटसच्या विरोधात व्हॅक्सिनची क्षमता आणि व्हॅक्सिनमुळे होणारी इम्युनिटी किती काळ लोकांचा बचाव करेल, हे खूप महत्त्वाचे राहणार आहे. यात बरंच काही बदलत आहे, असं सौम्या म्हणाल्या.
कोरोना संसर्गाचा निश्चितच अंत होईल. 2021च्या अखेरपर्यंत कोरोनाचा अंत झालेला आपण पाहू शकू. जगातील 30 टक्के लोकांचं लसीकरण झालं आहे. त्यामुळे मृत्यूचं प्रमाणही कमी होणार आहे, असं सांगतानाच 2022नंतर लसीकरणाला मोठ्या प्रमाणावर वेग येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
News English Summary: The chief scientist of the World Health Organization, Dr. Soumya Swaminathan has mentioned this possibility in an interview given to The Hindu daily. There may be several waves of corona in India in the coming period. Therefore, India’s problems may increase. The next 6 to 18 months are very important for India in the battle of Corona, said Soumya Swaminathan.
News English Title: Corona crisis response over next 6 8 months are critical says WHO scientist Soumya Swaminathan news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार