22 November 2024 5:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

VIDEO | टेलिप्रॉम्प्टरवर वाचून अधिकाऱ्यांना मंत्र देताना पंतप्रधान म्हणाले, 'देशात वेगाने कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढावे'?

India corona pandemic

नवी दिल्ली, १८ मे | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी राज्यातील आणि जिल्ह्यातील प्रादेशिक अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी कोरोनाशी दोन हात करताना येणाऱ्या समस्यांवर चर्चा करण्यात आली. कोरोनाविरुद्धच्या युद्धात विभागीय आयुक्तांच्या अधिकाऱ्यांची मोलाची भूमिका आहे. तुम्हीच युद्धाचे कमांडर आहात अशा शब्दांत मोदींनी अधिकाऱ्यांचे कौतुक केले. कुठल्याही युद्धात कमांडर योजनांना मूर्त स्वरूप देतात. लढा देतात आणि परिस्थितीनुसार निर्णय घेतात. तुम्ही भारताच्या लढ्यात महत्वाचे फील्ड कमांडर आहात असेही मोदी म्हणाले.

कोरोना व्हायरसच्या विरोधात लोकल कंटेनमेंट झोन, मोठ्या प्रमाणात टेस्टिंग आणि लोकांपर्यंत खरी माहिती पोहोचवणे हीच एक प्रकारची शस्त्रे आहेत. रुग्णालयात बेड किती आहेत याची माहिती जारी केल्याने लोकांची सोय होते. काळाबाजार रोखण्यात मदत मिळते. पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या माहितीनुसार, बैठकीत कर्नाटक, बिहार, आसाम, चंदीगड, तामिलनाडू, उत्तराखंड, मध्यप्रदेश, गोवा, हिमाचल प्रदेश आणि दिल्लीच्या अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. पंतप्रधान 20 मे रोजी जिल्हाधिकाऱ्यांशी देखील चर्चा करणार आहेत. यात महाराष्ट्रासह विविध राज्यांतील 54 जिल्हाधिकारी सहभागी होतील असे पीएमओच्या वतीने सांगण्यात आले आहे.

दरम्यान, पंतप्रधान मोदी प्रचार सभांपासून ते ऑनलाईन संवादात नेहमी टेलिप्रॉम्प्टरचा वापर करून समोरील वाचून सर्वकाही बोलत असतात. मात्र आजच्या संवादात त्यांनी टेलिप्रॉम्प्टरवरील मजकूर वाचताना भलतेच वाक्य बोलून गेल्याने त्याची चर्चा समाज माध्यमांवर सुरु झाली आहे. सदर व्हिडिओ आता समाज माध्यमांवर व्हायरल झाल्याने मोदींची खिल्ली उडवण्यास सुरुवात झाली आहे. टेलिप्रॉम्प्टरवर वाचून अधिकाऱ्यांना मंत्र देताना पंतप्रधान म्हणाले, ‘देशात वेगाने कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढावे’. मोदींच्या या चुकीच्या वाचण्याची भलतेच अर्थ लावण्यास समाज माध्यमांवर सुरुवात झाली आहे.

 

News English Summary: Modi wants a RAPID RISE in Corona Positive Cases our incompetent PM can not even read properly from a Teleprompter said congress leader Srivatsa news updates

News English Title: Modi wants a RAPID RISE in Corona Positive Cases our incompetent PM can not even read properly from a Teleprompter said congress leader Srivatsa news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x