बापरे! | हे अमृता फडणवीसांचे मंगळवारचे प्रेरणादायी विचार?, 'जब कुत्ते पीछे भौंक रहे हो तो'...
मुंबई, १८ मे | कोणत्याही विषयात ट्विट करून कायम प्रकाशझोतात राहण्याचा अमृता फडणवीस यांचा प्रयत्न काही नवा विषय राहिलेला नाही. त्यांना देखील कोणत्याही विषयात सत्ता बदलाची स्वप्न कायम पडत असतात. अनेकदा त्यांच्या ट्विटचा अर्थ त्यांना स्वतःला तरी समजतो का असा देखील प्रश्न उपस्थित होताना दिसला आहे.
यापूर्वी देखील त्यांच्या अनेक ‘निरर्थक ट्वीट्स’ला प्रसार माध्यमांनी ‘सूचक ट्विट’ असं संबोधल्याने त्यांच्या वायफळ ट्विटपणाला अनेकदा खतपाणी मिळाल्याचं देखील पाहायला मिळालं आहे. काल त्यांनी पुन्हा कोरोना आपत्ती आणि वादळाच्या विचारात शहरं आणि राज्य व्यस्त असताना एक निरर्थक ट्विट केल्याचं पाहायला मिळालं.
मुंबईत सोमवारी पहाटेपासून तौक्ते चक्रीवादळाचा मोठा जोर पाहायला मिळत आहे. त्यामुळे शहरात मुसळधार पाऊस आणि वादळी वारे वाहत आहेत. या पार्श्वभूमीवर अमृता फडणवीस यांनी ट्विट केले. ट्विट केलं वगरे ठीक आहे, पण त्यात ‘देखें अबके किसका नंबर आता है !’ अशी निरर्थक ओळ देखील ट्विट केली होती.
याच विषयाला अनुसरून राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी अमृता फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. उमेश पाटील यांनी एका मराठी टीव्ही टीव्ही वृत्तवाहिनीशी संवाद साधताना अमृता फडणवीस यांचा चांगलाच समाचार घेतला. आजपर्यंत जेवढे मुख्यमंत्री होऊन गेले त्यांच्या सौभाग्यवतींना मुख्यमंत्रीपद गेल्यावर जेवढं दुःख झालं नसेल तेवढं दुःख या माजी मुख्यमंत्र्यांच्या सौभाग्यवतींना झाले आहे. त्यामुळे त्या अस्वस्थतेतून शेरोशायरी करतात. अशा कठीण प्रसंगात सरकारवर संकट येईल अशी शेरोशायरी करण योग्य नाही, यावरून त्यांची सत्तेची लालसा दिसून येते. हे वर्तन माजी मुख्यमंत्र्यांच्या सौभाग्यवतीला न शोभणारे असल्याचे उमेश पाटील यांनी म्हटले. त्यानंतर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी देखील सडेतोड उत्तर दिलं होतं.
वास्तविक अमृता फडणवीस यांना टीका सहन होतं नाही हे वास्तव आहे. यापूर्वी देखील त्यांच्यावर झालेल्या टीकेवर त्यांनी संतप्त होऊन प्रतिक्रिया दिल्याचा इतिहास आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांचा एकेरी शब्दप्रयोग केला होता ते देखील जुनं नाही. आता त्यांच्या कालच्या ट्विटनंतर त्यानं पुन्हा संतापल्याचं शब्दातून स्पष्ट होतंय. अमृता फडणवीस यांना ‘प्रेरणादायी कोट’ मध्ये कुत्ते वगरे वगरे असे शब्द आवडतात हे विशेष. प्राणीप्रेमी आणि द्वेषपूर्वक प्राण्याचा शब्दप्रयोग या दोन भिन्न गोष्टी आहेत. सदर ट्विटमध्ये त्यांनी ‘कुत्ते’ हा शब्द द्वेषाने वापरल्याचे दिसतंय. त्यांनी म्हटलंय, “जब कुत्ते पीछे भौंक रहे हो तो, शेरनी कभी पीछे मुड़कर जवाब नाहीं देती !”
जब कुत्ते पीछे भौंक रहे हो तो,
शेरनी कभी पीछे मुड़कर जवाब नाहीं देती !#tuesdaymotivations #tuesdayvibe— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) May 18, 2021
News English Summary: The fact is that Amrita Fadnavis does not tolerate criticism. He has a history of reacting angrily to earlier criticisms. It is not old that he had used the single word of Congress MLA Bhai Jagtap a few days back. Now it is clear from his words that he is angry again after his tweet yesterday.
News English Title: Amruta Fadnavis shocking motivational thought expressed on tweet news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार