24 November 2024 7:53 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

तौक्ते वादळ | मोदींचा केवळ गुजरात नुकसानीचा पाहणी दौरा | महाराष्ट्रातून टीका टाळण्यासाठी फडणवीसांचा कोकण दौरा?

Tauktae cyclone

नवी दिल्ली, १९ मे | तौक्ते चक्रीवादळ सोमवारी रात्री साडे दहा वाजता सौराष्ट्रला धडकले. त्यानंतर किनारपट्टी भागात जमीन धसण्याचे प्रकार सुरू झाले. सुमारे अडीच ते तीन तास जमीन धसण्याचे प्रकार सुरू होते. वादळामुळे सौराष्ट्रातील 21 जिल्ह्यातील 84 तालुक्यात प्रचंड पाऊस झाला. आता पाऊस थांबला असला तरी या वादळी पावसामुळे गुजरातमध्ये आतापर्यंत 13 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच जागोजागी मोठ मोठे वृक्ष उन्मळून पडले आहेत.

मागील तीन दिवसांपासून तौक्ते वादळाने गुजरात आणि दीवला झोडपून काढलं आहे. त्यामुळे या परिसराचं मोठं नुकसान झालं आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरात आणि दीवमधील नुकसानीचा आढावा घेण्यासाठी थोड्याच वेळात गुजरातला पोहोचत आहेत. गुजरातच्या भावनगर येथून ते हवाई पाहणी करतील.

भावनगरला आल्यावर ते ऊना, दीव, जाफराबाद आणि महुवाची हवाई दलाच्या हेलिकॉप्टरने हवाई पाहणी करतील. त्यानंतर अहमदाबादमध्ये आढावा बैठक घेतील. या बैठकीनंतर ते गुजरात आणि दीवसाठी पॅकेज जाहीर करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पाहणी दौऱ्यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री विजय रुपाणी असतील.

विशेष म्हणजे महाराष्ट्रात देखील तौक्ते चक्रीवादळाने मोठं नुकसान केलेलं असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ गुजरातला वेळ देणार आहेत. गुजरातला लागून असलेल्या महाराष्ट्रात विशेष हेलिकॉप्टरने येण्यास काही मिनिटं लागतील. मात्र मोदी महाराष्ट्रातील लोकांसाठी वेळ काढणार नसल्याचं वृत्त आहे. परिणामी याची चुणूक भाजपाला लागली आणि राज्यातून टीका होऊ नये म्हणून कालच फडणवीस यांचा कोंकण दौरा जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार आज फडणवीस आणि दरेकर कोंकण दौऱ्यावर जाणार आहेत.

तत्पूर्वी कोकणातील संबंधित जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांनी नुकसानग्रस्त भागाची आधीच पाहणी केली असून संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आहे. मंत्री उदय सामंत आणि अदिती तटकरे तसेच कोकणातील आमदार आणि खासदार नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत आहेत. त्यानुसार स्थानिक प्रशासनाला आदेश देऊन नुकसानाचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवर मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री आणि प्रशासनाला परिस्थितीचा आढावा घेऊन आदेश दिले आहेत. आता फडणवीस दौऱ्यानंतर कोणती राजकीय टीका करतात ते पाहणं महत्वाचं आहे.

 

News English Summary: Gujarat and Diu have been battered by the storm for the last three days. This has caused a lot of damage to the area. Against this backdrop, Prime Minister Narendra Modi is arriving in Gujarat shortly to take stock of the damage in Gujarat and Diu.

News English Title: Cyclone Tauktae Prime minister Narendra Modi to visit Gujarat and Diu today to review damage news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x