25 November 2024 7:52 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

घरोघरी जाऊन वरिष्ठ नागरिकांच्या लसीकरणास केंद्र BMC'ला मान्यता देत नसेल तर आम्ही देऊ - मुंबई हायकोर्ट

India corona pandemic

मुंबई, १९ मे | राज्यात बाधित रुग्णांपेक्षा बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढून नव्या कोरोनाबाधितांचा आकडा खाली येऊ लागला आहे. त्यामुळे राज्यासाठी ही एक दिलासादायक बाब ठरली आहे. कालच्या आकडेवारीनुसार राज्यात दिवसभरात २८ हजार ४३८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. मात्र, त्याचवेळी ५२ हजार ८९८ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील अशा बऱ्या झालेल्या रुग्णांचा आकडा आता ४९ लाख २७ हजार ४८० इतका झाला असून राज्याचा रिकव्हरी रेट ९०.६९ टक्क्यांवर गेला आहेेेे.

दुसरीकडे मुंबई महानगरपालिकेने लसीकरण मोहीम देखील जोरात राबवली आहे. दरम्यान मुंबई महानगपालिकेने घरोघरी जाऊन वरिष्ठ नागरिकांच्या लसीकरणासंबंधित परवानगी केंद्र सरकारकडे मागितली होती. मात्र, ती केंद्राने फेटाळली होती. विशेष म्हणजे अशी मागणी इतर राज्यांमधून देखील पुढे येऊ लागली होती. याच विषयावरून काही दिवसांपूर्वी मुंबई हायकोर्टात एका याचिकेवर सुनावली पार पडली होती. त्यावेळी विषय वरिष्ठ नागरिकांशी संबंधित असताना घरोघरी जाऊन लसीकरण का सुरु केलं नाही? असा थेट प्रश्न न्यायालयाने केंद्र सरकारला विचारला होता.

आज पुन्हा याच विषयावरून मुंबई हायकोर्टात सुनावणी पार पडली. यावेळी हायकोर्टाने मुंबई महानगरपालिकेला प्रश्न करताना थेट परवानगीची हमी देण्याचं वक्तव्य करत केंद्राच्या मान्यतेची गरज नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या बाजूने यावर न्यायालयाला काय सांगितलं जातंय यावर सर्व अवलंबून आहे.

 

News English Summary: Door to Door Vaccination for Senior Citizens, Differently abled And Bed Ridden Citizens] Bombay High Court to BMC “If you can do door to door vaccination, we will allow you. Don’t wait for central government to give permission. Come to help of old residents” said Mumbai High court.

News English Title: Door to Door Vaccination for Senior Citizens plea in Mumbai High court news updates.

हॅशटॅग्स

#BMC(44)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x