कोरोना आपत्तीत जगात सर्वात वाईट कामगिरी करणारा नेता कोण?, मोदी ९० टक्के मतं मिळवत टॉपवर
वॉशिंग्टन, २१ मे | देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवण्यासाठी ट्रीपल-टी म्हणजेच टेस्टिंग, ट्रेसिंग आणि ट्रेकिंगवर जोर दिला जात आहे. या अंतर्गत बुधवारी विक्रमी 20 लाख 55 हजार 10 लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली. हे केवळ भारतात नाही, तर संपूर्ण जगात एका दिवसात केल्या जाणाऱ्या चाचण्यांचा सर्वात मोठा आकडा आहे.
आरोग्य मंत्रालयानुसार, देशभरात आतापर्यंत 32 कोटी 23 लाख 56 हजार 187 सँपल टेस्ट करण्यात आले आहेत. यापूर्वी मंगळवारीही देशात विक्रमी 20 लाख 8 हजार 296 कोरोना टेस्ट करण्यात आल्या होत्या. तर 11 मे रोजीही 19 लाख 83 हजार 804 टेस्ट करण्यात आल्या होत्या.
भारतामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे हाहाकार उडालाय. अनेक राज्यांमध्ये आरोग्य सुविधांची कमतरता दिसून येत आहे. औषधं, ऑक्सिजन बेड्स आणि लसींच्या तुटवड्यामुळे अनेक स्तरांमधून केंद्र सरकारच्या ढीसाळ कारभारावर टीका केली जात आहे.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी भारतामधील करोना परिस्थिती हाताळण्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना आणि त्यांच्या सरकारला अपयश आल्याची टीका अनेक लेखांमधून केल्याचं दिसत आहे. अशाच प्रकारे जगभरात करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांमधील नेत्यांसंदर्भात घेण्यात आलेल्या एका ऑनलाइन जनमत चाचणीमध्ये सर्वात वाईट कामगिरी करणारा नेता कोण असा प्रश्न विचारण्यात आला होता. या जनतमचाचणीमध्ये ९० टक्के लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना मत दिलं आहे. त्यामुळे करोनाचा सर्वाधिक फैलाव झालेल्या देशांमध्ये सर्वात वाईट कामगिरी करणारे सर्वोच्च नेतृत्व म्हणून मोदींना सर्वाधिक मतं मिळाली आहेत.
अमेरिकेमधील द कॉनव्हर्सेशन या वेबसाईटने ट्विटरवर घेतलेल्या जनमत चाचणीमध्ये करोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव झालेल्या देशांपैकी भारतीय नेतृत्व हे साथरोगाची परिस्थिती हातळ्यात सर्वात सुमार कमागिरी करणारं ठरल्याचं दिसून आलं आहे. आम्ही पाच देशांमधील तज्ज्ञांच्या मदतीने त्यांच्या देशातील नेतृत्वाने कशाप्रकारे ही साथ हाताळताना गोंधळ घातला यासंदर्भातील आढावा घेतलाय, असं सांगत द कॉनव्हर्सेशनने जनमत जाणून घेण्यासाठी एक ट्विटर पोल घेतला. “सर्वात वाईट कामगिरी कोणी केली?, ट्विटरवर केवळ चारच पर्याय देता येतात. त्यामुळे या चार पर्यायांपैकी इतर काही उत्तर असेल तर कमेंट करुन कळवा,” असं म्हणत पोल पोस्ट करण्यात आला होता. या प्रश्नासाठी ब्राझीलचे बोल्सोनारो, भारताचे मोदी, मॅक्सिकोचे अॅमलो आणि अमेरिकेचे ट्रम्प, असे चार पर्याय देण्यात आले होते.
संबंधित पोलमध्ये ७५ हजार ४५० जणांनी आपली मतं नोंदवली. त्यापैकी सर्वाधिक मतं म्हणजेच ९० टक्के मतं ही मोदींना मिळाली. म्हणजेच ७५ हजार ४५० जणांपैकी ६७ हजार ९०५ जणांनी मोदी हे जगामध्ये करोना परिस्थिती हातळ्यात सर्वात वाईट कामगिरी करणारे नेते असल्याचं म्हटलं आहे. त्या खालोखाल अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना ५ टक्के तर बोल्सोनारो यांना ३.७ टक्के मतं मिळाली आहेत. मॅक्सिकोच्या अॅमलो यांना या पोलमध्ये केवळ १.३ टक्के मतं मिळाली आहेत.
News English Summary: According to a poll conducted on Twitter by The Conversation website in the United States, the Indian leadership is one of the most affected countries in the world in terms of coronary heart disease. The Conversation took a Twitter poll to find out the public opinion, saying that we, with the help of experts from five countries, have taken stock of how their country’s leadership handled this mess.
News English Title: Twitter poll Indian PM Narendra Modi got 90 Percent votes in worst leaders screwed up their countries pandemic response poll news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News