22 November 2024 12:53 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

भाजप नेत्यांची पोलखोल | ट्विटरकडून कांगावाखोर भाजप नेत्याच्या टूलकिट पोस्टला 'फेरफार मीडिया' शेरा

Toolkit

नवी दिल्ली, २१ मे | देशात सध्या असलेल्या करोना व्हायरसला मोदी व्हायरल किंवा इंडियन व्हायरस असं म्हणण्याचं आवाहन करणारं एक टूलकिट सध्या सोशल मीडियावर काँग्रेसच्या नावाने व्हायरल होत होते. या टूलकिटवरून भाजपाकडून काँग्रेसवर जोरदार टीका करण्यात आली होती. त्यानंतर देशभरातील नेत्यांसहित राज्यातील भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी तर “प्रसंगी काँग्रेस देशद्रोह देखील करू शकेल”, अशा शब्दांत काँग्रेसवर निशाणा साधला होता.

त्यानंतर काँग्रेसनं भाजपाला प्रत्युत्तर देताना काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपावर परखड शब्दांमध्ये आगपाखड केली होती. “भाजपा हा खोटारडा, विखारी आणि कांगावाखोर पक्ष आहे”, असं सचिन सावंत म्हणाले होते. आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून त्यांनी हे ट्वीट केलं होते. विशेष म्हणजे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस देखील या अभियानात सामील झाले होते. मात्र आता भाजपच्या देशभरातील आणि राज्यातील सर्व नेत्यांची मोठी पोलखोल झाली आहे आणि ती पोलखोल केली आहे खुद्द ट्विटरने असंच म्हणावं लागेल. भाजपच्या नेत्यांनी शेअर केलेले डॉक्युमेंट हे मूळ डॉक्युमेंटमध्ये फेरफार करून पसरविण्यात आल्याचे सत्य समोर आले आहे. त्यामुळे भाजपचा खोटा प्रचार उघड झाला असून हे मोठी पोलखोल असल्याने भाजपमध्ये शांतता पसरली आहे.

ट्विटरच्या कॅलिफोर्नियास्थित कार्यालयाकडे कॉंग्रेसने दिलेल्या औपचारिक तक्रारीनंतर ट्विटरने ही मोठी कारवाई करत पुढील चौकशी केली आणि छेडछाड केलेले डॉक्युमेंट शेअर केल्याचं उघड झालं. कॉंग्रेस पक्षाने आपल्या तक्रारीत संबित पात्रा यांनी केलेले ट्विट आणि त्यानंतरचे अध्यक्ष भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि भाजप नेते बी.एल. संतोष यांनी बनावट आणि चुकीची माहिती पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटले होते.

विशेष म्हणजे भाजप नेत्यांची ट्विटर खातीही निलंबित करण्यात यावीत, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. ट्विटरच्या कारवाईनंतर कॉंग्रेसचे सोशल मीडिया सेल प्रमुख रोहन दुआ यांनी संबित पात्रा यांचे पोस्ट टॅग केले आणि लिहिले की, “आम्ही देशासमोर खोटे उघड करण्याचे आश्वासन दिले होते आणि आम्ही ते सिद्ध केलं आहे, असं म्हटलं आहे.

 

News English Summary: As per Twitter, posts are flagged as manipulated media if it has a reason to believe that media shared in a tweet has been significantly and deceptively altered or fabricated.

News English Title: Twitter posts are flagged as manipulated media shared by BJP national spokesperson Sambit Patra used fabricated media news updates.

हॅशटॅग्स

#SambitPatra(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x