24 November 2024 7:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

Health First | जाणून घ्या दुधात तूप घालून प्यायल्याने होणारे फायदे

benefits of ghee added milk

मुंबई २२ मे : तूप खाल्ल्यानं वजन वाढतं असा साधारण समज झालाय. मात्र हा समज आयुर्वेदानुसार चुकीचा आहे. तूपामध्ये खूप कमी प्रमाणात कॅलरीज असतात, त्यानं वजन वाढत नाही, असं आयुर्वेदशास्त्र सांगतं.तुपामुळे अनेक गंभीर आजारांपासून आपला बचाव होऊ शकतो. आयुर्वेदानुसार जर तूप दुधात घालून प्यायलं तर अनेक आजारांपासून आपली सुटका होऊ शकते. लहान मुलांसाठी तर हे खूप उपयुक्त असतं, कारण लहान मुलं सतत खेळत असतात. दुधात तूप टाकून प्यायल्यानं स्टॅमिना वाढतो. तूप घातलेलं दुध प्यायल्यानं हाडं मजबुत होतात. तर ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास होतो, त्यांच्यासाठी तर हे दुध अमृतासारखं असतं. गायीच्या तुपात कोलेस्ट्रॉल नसतं. त्यामुळे लठ्ठपणा वाढत नाही. तसंच गायीचं तूप हे आरोग्याच्या दृष्टीनं खूप फायदेशीर असतं. जाणून घ्या दुधात तूप घालून पिण्याचे फायदे…

1. निद्रानाश ची समस्या:
निद्रानाशाची समस्या असल्यास दररोज दुधात तूप घालून प्यावे. असं केल्याने मेंदूच्या नसा शांत होतात आणि शांत झोप लागते.

2. चमकणारी त्वचा:
दुधात आणि तुपात नैसर्गिक मॉइश्चरायझर असते. याचे सेवन केल्याने चेहऱ्यावर चकाकी येते. हे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यात मदत करते.

3. सांधेदुखी पासून आराम:
आजच्या काळात सांधेदुखी होणं देखील खूप सामान्य झाले आहे. या वर अद्याप काहीही प्रभावी उपाय सापडला नाही. इतर औषधांसह दूध तुपाचे सेवन करू शकता. तुपामधील आढळणारे के 2 दुधातील कॅल्शियम सामग्री शोषण्यात मदत करते.या मुळे सांधे दुखण्यात आराम मिळेल.

४. पोटासाठी फायदेशीर:
जर आपल्याला बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर दूधामध्ये तूप टाकून प्यावं. त्यात ब्यूट्रिक अॅसिड असतं ते आपल्या शरीरातील पचनासाठी असलेले एंझाईम्स वाढवतो. जर आपली पचनशक्ती कमी असेल तर आपण रात्री झोपण्यापूर्वी हे तूप टाकलेलं दूध नक्की प्या.

News English Summary: It is generally believed that eating ghee increases weight. However, this perception is wrong according to Ayurveda. Ghee contains very few calories, it does not cause weight gain, says Ayurveda. Ghee can protect you from many serious diseases. According to Ayurveda, if you add ghee to milk, you can get rid of many diseases.

News English Title: Drink ghee added milk it is beneficiary to our health news update article

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x