22 November 2024 9:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

पिझ्झा ब्रँड Dominos India चा डेटा लीक | डॉर्क वेबवर डेटा विक्रीला

Dominos India

मुंबई, २२ मे | प्रसिद्ध पिझ्झा ब्रँड Dominos India चा डेटा पुन्हा एकदा लीक झाला आहे. सुरक्षा तज्ज्ञांच्या (सिक्योरिटी एक्सपर्ट) मते, डॉर्क वेबवर 18 कोटी ऑर्डर्सचा डेटा उपलब्ध झाला आहे. हॅकरने अहवाल सादर केला आहे, ज्यात 13TB Dominos डेटाचा अ‍ॅक्सेस मिळवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हॅकरकडे 180,00,000 ऑर्डर्सची माहिती आहे ज्यात युजर्सचे फोन नंबर, ईमेल, पत्ता, पेमेंट डिटेल्स आणि क्रेडिट कार्डची माहिती आहे.

सुरक्षा तज्ज्ञ राजशेखर राजारिया यांनी ट्विटरवर याबाबतचा खुलासा केला आहे. त्यांनी सांगितले आहे की, पुन्हा एकदा Dominos चा डेटा लीक झाला आहे. ते म्हणाले की, सर्च इंजिनवर 18 कोटी युजर्सचा डेटा उपलब्ध झाला आहे. यात Dominos India वरुन नेहमी खरेदी करणाऱ्या युजर्सचा समावेश आहे. दरम्यान, प्रत्येकाचा वैयक्तिक डेटा लीक झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.

दुसरीकडे, डोमिनोज इंडियानं मात्र आमच्या युझर्सचा कोणत्याही प्रकारचा डेटा लीक झाला नसल्याचा दावा केला आहे. डोमिनोज ही जगभरातील एक प्रसिद्ध फूड सर्व्हिस कंपनी आहे. जगभरातील २८५ शहरांमध्ये डोमिनोजचे आउटलेट्स आहेत. डेटा लीक्सची प्रकरणं सातत्यानं समोर येत असून ऑनलाईन ग्राहकांचा डेटा ऑनलाइनच विकला जात असल्याचं सांगितलं जात आहे. ग्राहकांच्या डेटा विक्रीतून हॅकर्स कोट्यवधी रुपयांची कमाई करतात.

 

News English Summary: Data of famous pizza brand Dominos India has been leaked once again. According to security experts, data on 18 million orders has become available on the Dork Web. The hacker has submitted a report, in which he has gained access to 13TB of Dominos data.

News English Title: Dominos India users date hacked available on dark web for sale news updates.

हॅशटॅग्स

#Technology(78)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x