22 November 2024 3:49 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Health First | च्यवनप्राश खा आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवा

benefits of chyawanprash

मुंबई २२ मे : सध्या करोना व्हायरसच्या संक्रमणासोबतच मान्सूनमध्ये होणा-या आजारांचा धोकाही आपल्या आजुबाजूने घुटमळतो आहे. असा परिस्थितीत मुलांची विशेष काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. व्यक्तीची रोगप्रतिकार क्षमता जितकी जास्त असले तितका तो मनुष्य करोना विषाणूशी प्रभावीपणे लढतो आणि करोनाला बळी पडत नाही. सरकारने सुद्धा रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी विविध औषधी वनस्पतींची आणि उपाययोजनांची ( औषधी काढे ) शिफारस केली आहे.पण या सगळ्याची चव कडू असल्याने लहान मुले या गोष्टींचे सेवन करण्यास कंटाळा करतात. याऐवजी त्यांना च्यवनप्राश खाऊ दिले तर मात्र मुलांची रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढेल आणि मुले हे च्यवनप्राश खाण्यास कंटाळा सुद्धा करणार नाहीत.

च्यवनप्राश खाण्याचे फायदे:

1.हिवाळ्याच्या दिवसात च्यवनप्राशचे सेवन केल्यानं शरीरात उष्णता निर्माण करून थंडी च्या दुष्परिणामां पासून वाचवत.या शिवाय च्यवनप्राश खाल्ल्यानं आपली रोग प्रतिकारक शक्ती देखील वाढते. तसेच आजार देखील लांब राहतात.

2. सर्दी,खोकला, फ्लू, कफ झाल्यास ह्याचे सेवन करणं फायदेशीर आहे. दररोज सकाळ आणि संध्याकाळी च्यवनप्राश खाल्ल्यानं हिवाळ्यात होणारे आजार उद्भवत नाही.

3 . पचनाशी निगडित समस्यांमध्ये च्यवनप्राश खूप फायदेशीर आहे, हे दररोज खाल्ल्याने पचनाशी निगडित सर्व त्रास नाहीसे होतात आणि पचन प्रणाली बळकट होते.

4. च्यवनप्राश मध्ये आवळा आणि इतर औषधी वनस्पती असतात, जी आपल्या शरीरास व्हिटॅमिन्स आणि खनिजे देतात. या मुळे आपल्या क्रियाकलापांमध्ये तसेच लैंगिक सामर्थ्यात देखील वाढ होते.

5. जर आपले केस पांढरे झाले आहेत, तर च्यवनप्राश खाणं आपल्यासाठी एक उत्तम उपाय आहे. दररोज च्यवनप्राश खाणं आपल्या पांढऱ्या होणाऱ्या केसांना काळे करण्याची क्षमता राखतो. या मुळे आपली नखे देखील बळकट होतात.

6. हिवाळ्यात खोकला होणं ही सामान्य बाब आहे, परंतु आपल्याला जुना खोकला असल्यास आपण च्यवनप्राश नक्की खा. हे आपल्या खोखल्याला पूर्णपणे बरं करेल. हे आपल्या हिमोग्लोबिनला देखील वाढविण्याचे काम करत.

7. लहान मुलांमध्ये होणारे त्रास देखील च्यवनप्राश खाल्ल्याने दूर होतात. हिवाळ्यात मुलं देखील आरोग्याशी निगडित त्रासाला सामोरी जातात. च्यवनप्राशचे नियमितपणे सेवन केल्यानं हे मुलांना आतून सामर्थ्य देत.

8 . स्त्रियांसाठी देखील च्यवनप्राशचे सेवन करणं खूप फायदेशीर असत. जर मासिक पाळी नियमानं येत नसेल, तर च्यवनप्राशचे सेवन आपल्याला मासिक पाळीच्या समस्यांपासून दूर ठेवतात.

9 . मुलं असो किंवा मोठे असो, च्यवनप्राशचे नियमितपणे सेवन केल्यानं मेंदूची क्रिया आणि एकाग्रता वाढते. या मुळे मानसिक ताण कमी होतो आणि मेंदू निरोगी राहतो.

10 . हे शरीराच्या अंतर्गत अंगाची स्वच्छता करून हानिकारक घटक दूर करण्यात मदत करतं. या शिवाय हे रक्तदाब पातळी नियंत्रित करण्यास उपयुक्त असत.

 

News English Summary: At present, along with the transmission of Corona virus, the risk of diseases occurring in the monsoon is also looming around us. The government has also recommended various medicinal plants and remedies (herbal extracts) to boost the immune system. Instead, if they are given Chyawanprash, the immune system of the children will also increase and the children will not get bored of eating Chyawanprash.

News English Title: Eating Chyawanprash daily is beneficiary to our health news update article

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x