तिसरी लाट | लहान मुलांना कोरोनापासून कसं सुरक्षित ठेवता येईल यासाठी मुख्यमंत्री सतर्क | महत्वाच्या बैठका
मुंबई, २३ मे | देशात सध्या कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ऑक्सिजन, बेड, व्हेंटिलेटरसह अत्यावश्यक औषधांचा तुटवडा भासत आहे. यामुळे आरोग्य यंत्रनेवर प्रचंड ताण आलेले आहे. यातच आता तज्ञांकडून कोरोनाच्या तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे देशातील 35 टक्के लोक तिसऱ्या लाटेच्या विळ्याख्यात येत असून याचा सर्वात जास्त परिणाम लहान मुलांवर होणार आहे. याच पार्श्वभूमीवर बाल आयोगाने प्रत्येक राज्यांतील आयसीयू बेडसह 22 उपकरणांचा डेटा मागितला आहे.
राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने (एनसीपीसीआर) प्रत्येक राज्यांना लहान मुलांसाठी आरोग्याच्या पायाभूत सुविधांची आकडेवारी एका आठवड्यात सादर करण्याचे आदेश दिले आहेत. ‘आरोग्याच्या पायाभूत सुविधांची काय स्थिती आहे, हे दुसर्या लाटेदरम्यान सर्वांसमोर आले आहे. त्यामुळे देशात सध्या आरोग्याच्या पायाभूत सुविधांच्या कमतरतेची मोठी समस्या आहे. विद्यमान पायाभूत सुविधा देखील पूर्णपणे कार्यरत नसल्याचे एनसीपीसीआरचे अध्यक्ष प्रियांक कानुंगो यांनी सांगितले. ते पुढे बोलताना म्हणाले की, वैद्यकीय यंत्रणेत तांत्रिक तंत्रज्ञांची कमतरता आणि निष्काळजी वृत्तीमुळे दुसऱ्या लाटेत कोरोनाचे नवीन प्रकरणे वाढले आहे.
दुसरीकडे राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोनाचा धोका असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर लहान मुलं आणि बालकांमधील कोविड संसर्ग रोखण्यासाठी बाल रोगविषयक टास्क फोर्सची स्थापन करण्यात आली आहे. या बालरोग तज्ज्ञांच्या टास्क फोर्सचे राज्यातील बालरोग तज्ञांना मार्गदर्शन केले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील डॉक्टर्सशी संवाद साधला. त्यामुळे राज्य सरकार लहान मुलांच्या बाबतीत अधिक सतर्क झाल्याचं पाहायला मिळतंय.
कोरोना विरुद्ध आपण जी लढाई लढतो आहोत त्यात पूर्ण यश नाही पण रुग्ण संख्या नियंत्रणात ठेवण्यात आपल्याला यश येतेय पण यात तुम्ही सगळे डॉक्टर्स, आरोग्य यंत्रणा, सरकारला सहकार्य करणारे सर्व पक्षांचे लोक, सर्वसामान्य नागरिक यांचे हे यश आहे, मी केवळ निमित्तमात्र आहे असं मुख्यमंत्री म्हणाले.
News English Summary: A Pediatric Task Force has been set up to prevent covid infections in infants and children. This pediatrician task force guided pediatricians in the state. On this occasion, Chief Minister Uddhav Thackeray also interacted with the doctors. Therefore, the state government has become more vigilant in the matter of children.
News English Title: CM Uddhav Thackeray conversation on prevention of Covid in children by Maharashtras pediatric taskforce news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार