21 November 2024 10:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

महाराष्ट्र लॉक टू अनलॉक? | एकूण ४ टप्यात असू शकतो राज्य सरकारचा प्लॅन

Maharashtra corona pandemic

मुंबई, २४ मे | मागील दीड-दोन महिन्यांपासून कोरोना संकटाशी दोन हात करणाऱ्या राज्यातील नागरिकांसाठी जून महिना आनंदाची झुळूक घेऊन येणारा ठरणार आहे. राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये आता कोरोनाचा प्रादुर्भाव घटताना दिसतो आहे. त्यामुळे ज्या जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या कमी आणि मृतांचा आकडाही कमी असेल त्या जिल्ह्यांमध्ये १ जूननंतर लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने शिथिल करण्याचे संकेत आरोग्यमंत्र्यांनी दिले आहेत. जून महिन्यात लसींचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाल्यानंतर राज्यभरात २४ तास लसीकरण मोहीम राबवण्याची ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी बालरोगतज्ज्ञांच्या बैठकीत बोलताना दिली. तिसरी महत्त्वाची बातमी म्हणजे येत्या १० जून रोजी मान्सून तळकोकणात दाखल होईल, असे हवामान खात्याने सांगितले आहे.

सरलेल्या आठवड्यात १७ ते २२ मे या कालावधीत रुग्णसंख्या कमी होताना दिसत असून ती ३० हजारांच्या आत आली आहे. केवळ बुधवार, १९ मे रोजी संख्या ३० हजारांपेक्षा अधिक होती. नाशिक, कोल्हापूर व अहमदनगर जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या घटली असल्यानेच कडक लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी निर्बंध शिथिल करण्याचे संकेत दिले होते.

ठाकरे सरकार 1 जूनपासून लॉकडाऊन उठवण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करेल. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात दुकाने उघडली जातील. गेल्या काही दिवसांत दुकाने बंद असल्यामुळे राज्यातील व्यापाऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. परिणामी पहिल्या टप्प्यात हे सर्व व्यवहार सुरु करण्यावर सरकार भर देईल. तर तिसऱ्या टप्प्यात हॉटेल, रेस्टॉरंटस, बार आणि मद्यविक्रीची दुकाने सुरु करण्यात येतील. त्यानंतर चौथ्या टप्प्यात सरकारकडून लोकल सेवा आणि धार्मिक स्थळे सुरु केली जातील. याच काळात जिल्हाबंदी कधी उठवायची याबाबत परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल.

 

News English Summary: In districts where the number of patients is low and the death toll is low, the lockdown will be phased out after June 1, the health minister said. Chief Minister Uddhav Thackeray, while addressing a meeting of pediatricians on Sunday, vowed to launch a 24-hour vaccination drive across the state after adequate stocks of vaccines became available in June.

News English Title: Unlock process in Maharashtra may implement in four steps news updates.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x