Health First | जाणून घ्या भेंडी खाण्याचे आरोग्यदायी फायदे । नक्की वाचा
मुंबई २४ मे : उन्हाळ्यातील भाजीमध्ये एक भेंडी आहे, जी सर्व भाज्यांमध्ये विशेष मानली जाते. बर्याच लोकांची ही पहिली पसंती आहे, तर बऱ्याच लोकांना भेंडी ही आवडत नाहीत आपण उन्हाळ्यात भेंडी खाल्ल्यासरोगप्रतिकार शक्ती चांगली होते, भेंडी खाल्ल्याने बहुतेक रोगांशी लढा देण्यास शरीराला सामर्थ्य मिळते आणिशरीर सहजपणे व्हायरल इन्फेक्शनशी लढू शकते. यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते.ही लेडी फिंगर म्हणून ओळखली जाते जी लहान मुलांना खूप आवडीची आहे. भेंडीचे काही फायदे जाणून घ्या.
१. भेंड्यांचे तुकडे करून पाण्यासोबत वाटून हे मिश्रण गाळावे. हा लेप चेहर्यावर लावल्याने काळे डाग दूर होतात.
२. मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी अर्धवट शिजवलेली भेंडीची भाजी खायला हवी. यात भरपूर प्रमाणात फायबर असतं. यामुळे रक्तातील शर्करा नियंत्रणात राहण्यास मदत होते.
३. वजन कमी करायचे असेल तर दररोज कच्ची भेंडी चावून खायला हवी. कच्ची खाणे शक्य नसेल तर अर्धवट शिजवून खाऊ शकता.
४. भेंडीमुळे मेंदूचं कार्य सुरळीत सुरू राहतं. यामुळे लहान मुलांच्या मेंदूच्या वाढीसाठीही भेंडी उपयुक्त आहे.
५. भेंडी रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.
६. गरोदरपणात भेंडीचे सेवन करणे फायदेशीर आहे. या मध्ये फोलेट नावाचे पोषक घटक आढळतात जे गर्भाच्या मेंदूच्या वाढीस महत्त्वाची भूमिका बजावते.या व्यतिरिक्त भेंडीमध्ये अनेक पोषक घटक आढळतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
७. भेंडीमध्ये व्हिटॅमिन-ए, बीटा-कॅरोटीन आणि अँटी-ऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात, जे सेल्युलर मेटाबोलिझमद्वारे निर्मित मुक्त रॅडिकल्स काढून टाकण्यास मदत करतात. हे कण अंधत्व साठी कारणीभूत आहेत. याशिवाय भेंडी मोतीबिंदूपासूनही संरक्षण करते.
८. भेंडीमध्ये आढळणारा चिकट पदार्थ आपल्या हाडांसाठी उपयुक्त आहे. या मध्ये आढळणारे व्हिटॅमिन-के हाडे मजबूत करण्यास मदत करते.
९. अशक्तपणामध्ये देखील खूप फायदेशीर आहे. त्यात असलेले लोह हिमोग्लोबिन तयार करण्यास मदत करते आणि व्हिटॅमिन-के रक्तस्त्राव थांबविण्याचे कार्य करते.
१०. भेंडी आपले हृदय देखील निरोगी ठेवते. त्यात उपस्थित पेक्टिन कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते, तसेच या मध्ये आढळणारे विरघळणारे फायबर, रक्तातील कोलेस्टेरॉलचे नियंत्रण करते ज्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो.
११. भेंडी आपल्या आहारात समाविष्ट केल्याने कर्क रोग पळवून लावू शकता. ही कोलन कर्करोग बरे करण्यात फायदेशीर आहे. हे आतड्या मधील असलेले विषारी घटक बाहेर काढण्यात मदत करते, या मुळे आंतड्या स्वच्छ राहतात. आणि योग्यरीत्या काम करतात.
१२. भेंडी वजन कमी करण्यासह त्वचेला देखील तरुण ठेवते. याचे सेवन केल्याने केसांना सुंदर, घनदाट,आणि चमकदार करण्यासाठी करतात. याचे चिकट तत्व लिंबूसह शॅम्पू प्रमाणे वापरतात.
News English Summary: The summer vegetable has an okra, which is considered special among all vegetables. While this is the first choice of many people, many people do not like okra. Eating okra in summer improves the immune system. Eating okra strengthens the body to fight most diseases and the body can easily fight viral infections. This boosts the immune system. It is known as Lady Finger which is very popular among children. Learn some of the benefits of okra.
News English Title: Eating okra is beneficiary to our health news update article
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार