अजब | राज्य सरकार देत असलेल्या मोफत लसीवर मुंबई भाजपची लोकांना 'मोफत लस ऑफर'
मुंबई, २४ मे | कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात असून महाविकास आघाडी सरकारनं मोफत लसीकरणाचा निर्णय घेतला होता. राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींचं मोफत लसीकरण करण्यात येणार असल्याचा निर्णय २८ एप्रिलला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता.
आज मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत १८ ते ४४ या वयोगटातील सर्व नागरिकांना मोफत लस देण्याचा निर्णय घेण्यात आला.#BreakTheChain pic.twitter.com/7JwMj3FbKo
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 28, 2021
१८ ते ४४ वर्ष वयोगटातील नागरिकांचे लसीकरण मोफत करण्यात येणार आहे. म्हणजेच या वयोगटातील ५ कोटी ७१ लाख नागरिकांचे मोफत लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी सर्वसाधारण पणे लसीचे १२ कोटी डोस लागणार असल्याची माहिती आहे. मोफत लसीकरणामुळं राज्याच्या तिजोरीवर साडे सहा हजार कोटींचा भार पडणार आहे. त्यानुसार राज्य सरकारने अधिकृत घोषणा देखील केली होती. मात्र भाजपच्या आमदारांची अजब वक्तव्य सुरु झाली आहेत.
अतुल भातखळकर यांनी ट्विटरवरून एका व्हिडीओद्वारे ही ऑफर दिली आहे. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून कसे अपयशी ठरले आहेत, याकडेही लक्ष वेधले. तौक्ते वादळामुळे झालेल्या पावसाने मुंबईलाही अक्षरश: झोडपून काढलं. त्यामुळे समुद्र किनारी राहणाऱ्या मच्छिमारांचं मोठं नुकसान झालं असून त्यांची अजूनही दखल घेण्यात आली नाही. त्यावरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. आदित्य ठाकरे उपनगरात दाखवा आणि 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे मोफत लसीकरण करून घ्या, अशी ऑफरच अतुल भातखळकर यांनी दिली आहे. विशेष म्हणजे जी लस राज्य सरकार मोफतच देणार आहे, त्याचं लसीवर भाजप आमदार मोफत लसीच्या ऑफर देत असल्याने समाज माध्यमांवर त्यांची खिल्ली उडवली जातं आहे.
हरवलेले पालकमंत्री @AUThackeray कुणाला दिसले का तौक्ते वादळानंतर ? सापडले तर सांगा आम्हालाही… pic.twitter.com/Ep7vbmVtMP
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) May 24, 2021
News English Summary: Emphasis is being placed on vaccination to overcome corona and the Mahavikas Alliance government had decided to provide free vaccination. The decision to provide free vaccination to persons between the ages of 18 and 44 in the state was taken at a meeting of the state cabinet on April 28.
News English Title: Free vaccination to persons between the ages of 18 and 44 in the state of Maharashtra news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS