22 November 2024 2:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य
x

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा मुलांवर गंभीर परिणाम होण्याचे संकेत नाहीत - एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया

India corona pandemic

नवी दिल्ली, २४ मे | देशातील कोरोनाची दुसरी लाट हळुहळू कमी होताना दिसत आहे. देशात रविवारी 2 लाख 22 हजार 704 नवीन संक्रमित आढळले. हा आकडा मागील 38 दिवसातील सर्वात कमी आहे. यापूर्वी 15 एप्रिलला 2.16 संक्रमितांची नोंद झाली आहे. तर, रविवारी 4,452 संक्रमितांचा मृत्यू झाला. दिलासादायक बाब म्हणजे, 3 लाख 2 हजार 83 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या देशात तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी सरकार सज्ज होताना दिसत आहे.

दरम्यान, कमकुवत होत असलेल्या कोरोनाच्या दुसर्‍या लाटेदरम्यान आणखी एक दिलासादायक बातमी आली आहे. सरकारनुसार,आतापर्यंत असे कोणतेही संकेत मिळालेले नाहीत की, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा मुलांवर गंभीर परिणाम होईल. आत्तापर्यंत असे म्हटले जात होते की, याचा परिणाम सर्वात जास्त मुलांवर होईल.

सोमवारी आरोग्य मंत्रालयाने देशातील कोरोनाच्या स्थितीबाबत पत्रकार परिषद घेतली. यामध्ये एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले की, कोरोनाच्या पहिल्या आणि दुसर्‍या लाटेत लहान मुलांमध्ये संसर्ग फारच कमी दिसून आला आहे. आतापर्यंत असे दिसून येत नाही की, तिसऱ्या लाटेत मुलांमध्ये संसर्ग दिसून येईल. असे म्हटले जात आहे की, मुलं सर्वात जास्त संक्रमित होतील, परंतु बालरोग असोसिएशनने म्हटले आहे की, हे फॅक्टवर आधारित नाही. याचा मुलांवर परिणाम होऊ नये, यासाठी लोकांनी घाबरू नये.

 

News English Summary: It has been said that children will be infected the most in the third wave but Pediatrics Association has said that this is not based on facts. It might not impact children so people should not fear said Dr Randeep Guleria, a Director of AIIMS

News English Title: Pediatrics Association has said that It might not impact children said Dr Randeep Guleria a Director of AIIMS news updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x