19 April 2025 3:45 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Technologies Share Price | मालामाल करणार टाटा टेक शेअर्स, मिळेल 66 टक्के परतावा, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH ITI Share Price | आयटीआय शेअर फोकसमध्ये, यापूर्वी दिला 2309 टक्के परतावा, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ITI Mazagon Dock Share Price | जबरदस्त शेअर, 3,122% परतावा दिला, या स्टॉकची पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK AWL Share Price | 50 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर मालामाल करणार - NSE: AWL HUDCO Share Price | तब्बल 852 टक्के परतावा देणारा सरकारी कंपनीचा शेअर, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO TTML Share Price | टाटा ग्रुपचा स्वस्त शेअर, यापूर्वी 2393% परतावा दिला, पेनी स्टॉक टार्गेट नोट करा - NSE: TTML JSW Steel Share Price | हा स्टील कंपनीचा स्वस्त शेअर खरेदी करा, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JSWSTEEL
x

VIDEO | टूलकिट प्रकरणावरून भाजपची पोलखोल होताच दिल्ली पोलिसांच्या विशेष सेलची ट्विटर कार्यालयावर धाड

Toolkit

गुडगांव, २४ मे | देशात सध्या असलेल्या करोना व्हायरसला मोदी व्हायरल किंवा इंडियन व्हायरस असं म्हणण्याचं आवाहन करणारं एक टूलकिट सोशल मीडियावर काँग्रेसच्या नावाने व्हायरल झालं होतं. या टूलकिटवरून भाजपाकडून काँग्रेसवर जोरदार टीका करण्यात आली होती. त्यानंतर देशभरातील नेत्यांसहित राज्यातील भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी तर “प्रसंगी काँग्रेस देशद्रोह देखील करू शकेल”, अशा शब्दांत काँग्रेसवर निशाणा साधला होता.

त्यानंतर काँग्रेसनं भाजपाला प्रत्युत्तर देताना काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपावर परखड शब्दांमध्ये आगपाखड केली होती. “भाजपा हा खोटारडा, विखारी आणि कांगावाखोर पक्ष आहे”, असं सचिन सावंत म्हणाले होते. आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून त्यांनी हे ट्वीट केलं होते. विशेष म्हणजे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस देखील या अभियानात सामील झाले होते. मात्र त्यानंतर भाजपच्या देशभरातील आणि राज्यातील सर्व नेत्यांची मोठी पोलखोल झाली होती आणि ती पोलखोल केली होती खुद्द ट्विटरने. भाजपच्या नेत्यांनी शेअर केलेले डॉक्युमेंट हे मूळ डॉक्युमेंटमध्ये फेरफार करून पसरविण्यात आल्याचे सत्य समोर आले होते. त्यामुळे भाजपचा खोटा प्रचार उघड झाला होता आणि मोठी पोलखोल झाल्याने भाजपमध्ये शांतता पसरली होती.

विशेष म्हणजे भाजप नेत्यांची ट्विटर खातीही निलंबित करण्यात यावीत, अशी मागणी काँग्रेसने केली होती. ट्विटरच्या कारवाईनंतर कॉंग्रेसचे सोशल मीडिया सेल प्रमुख रोहन दुआ यांनी संबित पात्रा यांचे पोस्ट टॅग केले आणि लिहिले होते की, “आम्ही देशासमोर खोटे उघड करण्याचे आश्वासन दिले होते आणि आम्ही ते सिद्ध केलं आहे, असं म्हटलं होते.

दरम्यान, ट्विटर कारवाई करणार या शंकेने भाजपमध्ये चिंता पसरलेली असताना आता एक धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. कारण ट्विटर इंडियाच्या गुडगांव येथील कार्यालयावर दिल्ली पोलिसांच्या विशेष सेलने धाड टाकली आहे. ट्विटर इंडियाला अधिकृतपणे नोटीस देखील बजावण्यात आली आहे. त्यामुळे मोदी सरकार आता ट्विटरवर दबाव निर्माण करत असल्याचं म्हटलं जातंय.

 

News English Summary: The Delhi Police Special Cell raided offices of Twitter India in Delhi and Gurgaon on Monday evening. This comes a day after police had sent a letter to Twitter India after the platform labelled BJP national spokesperson Sambit Patra’s tweet as “manipulated media”.

News English Title: The Delhi Police Special Cell raided offices of Twitter India in Delhi and Gurgaon on Monday evening news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#twitter(25)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या