21 November 2024 8:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

राष्ट्रवादीच्या आमदाराने उभारलेल्या कोविड सेंटरची योगी सरकारला भुरळ | मुख्य सचिवांची आ. निलेश लंकेशी चर्चा

Uttar Pradesh Corona pandemic

पारनेर, २६ मे | महाराष्ट्र सरकार मागील अनेक दिवसांपासून कोरोना नियंत्रण करण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. यामध्ये अनेक लोकप्रतिनिधी देखील महत्वाची भूमिका बजावत आहेत. महाराष्ट्रात दुसऱ्या लाटेच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी लोकसहभागातून उभारलेल्या कोविड सेंटरची चांगलीच चर्चा आहे. परदेशातूनही या सेंटरला मदत मिळत आहे. तसेच, आता या कोविड सेंटरची उत्तर प्रदेश सरकारला देखील भूरळ पडली आहे. उत्तर प्रदेशात सामान्य लोकांसहित योगी सरकारमधील मंत्री आणि आमदारांनी देखील कोरोनामुळे प्राण गमावले आहेत.

उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव राजेंद्र कुमार तिवारी यांची आणि आमदार निलेश लंकेची फोनवरुन चर्चा झाली आहे. ज्यात उत्तर प्रदेशात लोकसहभागातून कोविड सेंटर ऊभारणीचा प्रकल्प हाती घेण्यात येणार असल्याचं तिवारी यांनी सांगितलं आहे. पारनेरच्या भाळवणी येथे निलेश लंके यांनी उभारलेली कोविड सेंटर चांगलंच चर्चेत आहे. ११०० बेड्सची सोय असलेल्या या कोविड सेंटरमध्ये कारभार कसा चालतो, औषधोपचार कसे केले जातात, दैनंदिन उपक्रम, रुग्णांची देखभाल, जेवणाची व्यवस्था या सर्व गोष्टींसाठी लंके यांनी यंत्रणा कशी उभारली याबद्दल तिवारी यांनी माहिती घेतली आहे.

आमदार लंके यांनीही या चर्चेत कोविड सेंटरच्या उभारणीपासून ते रुग्णांची काळजी कशी घेतली जाते याबद्दलची माहिती तिवारी यांना दिली आहे. उत्तर प्रदेशात कोरोनामुळे अत्यंत भीषण अवस्था असल्याने असे फलदायी ठरलेले विषय समजून घेण्यासाठी प्रशासनाला कामाला लावण्यात आलं असून नेमकं काय केल्याने हे यश मिळालं तेच युपीच्या मुख्य सचिवांनी समजून घेतलं आहे.

 

News English Summary: Uttar Pradesh Chief Secretary Rajendra Kumar Tiwari and MLA Nilesh Lanka had a phone conversation. In which, the project of setting up Kovid Center in Uttar Pradesh will be undertaken through public participation, said Tiwari.

News English Title: Uttar Pradesh chief secretary Rajendra Kumar Tiwari called NCP MLA Nilesh Lanke to understand Parner covid care center model news updates.

हॅशटॅग्स

#MLANileshLanke(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x