22 November 2024 5:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

भारतात कोरोनामुळे प्रत्यक्षात 42 लाख मृत्यू, तर 70 कोटींपेक्षा अधिक लोकांना कोरोनाची लागण - न्यूयॉर्क टाइम्स रिपोर्ट

India corona pandemic

न्यूयॉर्क, २६ मे | देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत सलग चार दिवस घट झाल्यानंतर किंचितशी वाढ झाली आहे. आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत तब्बल 12 हजारांनी वाढ झाली आहे. कालच्या दिवसात 2 लाख 8 हजार 921 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. मोठ्या कालावधीनंतर एका दिवसातील रुग्णसंख्या दोन लाखांच्या खाली गेली होती, परंतु पुन्हा एकदा हा आकडा वाढला आहे. कालच्या दिवसात 4 हजार 157 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. नवे कोरोनाग्रस्त रुग्ण वाढले, त्याचप्रमाणे कोरोनाबळींच्या संख्येतही वाढ झाल्याने काहीशी चिंता व्यक्त होत आहे. दुसरीकडे लसीकरण झालेल्या नागरिकांच्या संख्येने वीस कोटींचा आकडा ओलांडला आहे

यापूर्वी सरकारी आकडेवारी आणि प्रत्यक्ष मृत्यू यामध्ये मोठा फरक असल्याचं अनेक माध्यमांनी म्हटलं आहे. आता न्यूयॉर्क टाइम्सने आपल्या एका रिपोर्टमध्ये भारतातील कोरोना संक्रमण आणि कोरोनामुळे झालेल्या मृत्यूवर धक्कादायक दावा केला आहे.

अधिकृत आकडेवारीनुसार, देशात कोरोनाने 2.69 लोक संक्रमित झाले. तर 3 लाख 7 हजारच्या जवळपास लोकांचा कोरोनाने बळी घेतला. प्रत्यक्षात परिस्थिती यापेक्षा वेगळी आहे. जागतिक आरोग्य संघटनेने सुद्धा केवळ भारतातच नव्हे, तर जगात कोरोनाने होणाऱ्या मृत्यूचा आकडा प्रत्यक्षात 2 ते 3 पटीने अधिक असल्याचा अंदाज लावला आहे. त्यात भारतामध्ये कोरोनात मृत्यूची आकडेवारी प्रत्यक्षात अधिक असण्याची शक्यता जास्त आहे.

एमोरी विद्यापीठाच्या महामारी तज्ज्ञ संशोधक कायोका शियोडा यांनी सांगितले, की भारतात रुग्णालये कोरोना संक्रमितांनी भरले आहेत. कोरोनामुळे प्रामुख्याने ग्रामीण भागांत कित्येक लोकांचा मृत्यू घरातच होत आहे. अशा प्रकारच्या मृत्यूंची अधिकृत आकड्यांमध्ये नोंद होत नाही. भारतात प्रयोगशाळा सुद्धा कमी आहेत. मृत्यूचे खरे कारण शोधणे कठीण असते. कोरोना महामारी येण्यापूर्वी सुद्धा भारतात प्रत्येक 5 मृतदेहांपैकी 4 मृतदेहांची वैद्यकीय चाचणी होत नव्हती.

तज्ज्ञांच्या मदतीने तयार केला रिपोर्ट:
भारतात कोरोनामुळे किती मृत्यू झाले याची आकडेवारी गोळा करण्यासाठी द न्यूयॉर्क टाइम्सने तज्ज्ञांची मदत घेतली. या तज्ज्ञांनी भारतातील कोरोना महामारीला तीन भागांत विभागले. यात सामान्य परिस्थिती, वाइट स्थिती आणि अत्यंत वाइट स्थिती असे वर्गीकरण करण्यात आले. त्यांनी तयार केलेल्या रिपोर्टनुसार, कोरोनामुळे सरकारने जी आकडेवारी जारी केली त्याहून कित्येक पटीने जास्त मृत्यू प्रत्यक्षात झाले आहेत.

तज्ज्ञांनी परिस्थितीचा आढावा घेतला. कोरोना संक्रमणाची जी आकडेवारी सरकारने नोंदवली. प्रत्यक्षात कोरोना संक्रमण फैलावण्याची गती 15 पटीने अधिक होती. संक्रमणामुळे होणारा मृत्यू 0.15% असल्याचे अधिकृत आकड्यांत म्हटले आहे. त्याचाच आधार घेऊन पाहिल्यास मृतांचा आकडा दुप्पट असल्याचे निदर्शनास आले. एक्सपर्ट्सच्या अंदाजानुसार, देशात 40.42 लोकांना कोरोना संक्रमण झाले असून त्यापैकी 6 लाख लोकांचा मृत्यू झाला.

भारतात एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने इतर 20 जणांना संक्रमण झाले. तसेच 0.30% लोकांचा मृत्यू झाला असे गृहित धरले, तर भारतात अधिकृत आकड्यांपेक्षा 5 पट अधिक मृत्यू प्रत्यक्षात झाले असे म्हणता येईल. सेंटर फॉर डिसीज डायनामिक्सचे संचालक डॉ. रमनन लक्ष्मीनारायणन यांनी सांगितले, भारतात संक्रमण आणि मृत्यूच्या आकडे कमी मोजण्यात आले आहेत. त्यांनी अशा परिस्थितीत तीन विविध माध्यमातून मिळालेल्या आकडेवारीचा अभ्यास करून त्याचे विश्लेषण केले. त्यातून जवळपास 50-60 कोटी भारतीयांना कोरोनाची लागण झाली असे निदर्शनास आले आहे.

तीन देशव्यापी सीरो सर्व्हे:
भारतात कोरोना संक्रमण आणि मृत्यूचा अंदाज लावण्यासाठी तज्ज्ञांनी सीरो सर्व्हेच्या आकड्यांची सुद्धा मदत घेतली. ही आकडेवारी वेग-वेगळ्या काळात घेण्यात आली आहे. कोरोनाचे संक्रमण झाल्यानंतर बरे होण्यासाठी विशिष्ट अँटीबॉडी तयार होतात. त्याचा अभ्यास सीरो सर्व्हेमध्ये केला जातो. याले सकूल ऑफ पब्लिक हेल्थचे सहाय्यक प्राध्यापक डेन वीनबर्गर यांनी सांगितल्याप्रमाणे सीरो सर्व्हेच्या काही मर्यादा आहेत. पण, प्रत्यक्ष आकडेवारीचा अंदाज लावण्यासाठी ते खूप महत्वाचे आहेत.

 

News English Summary: Many media outlets have suggested that there is a big difference between government figures and actual deaths. Now the New York Times has made a shocking claim in its report on corona infections and coronary deaths in India.

News English Title: India coronavirus actual death toll Covid 19 situation New York Times reports amid second wave in India news updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x