24 November 2024 2:50 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर, नव्या वर्षात पगारात 186 टक्क्यांनी वाढ होणार, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | 10 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, 6 महिन्यात 116% परतावा दिला, संधी सोडू नका - BSE: 540259 Apollo Micro Systems Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: APOLLO Post Office Interest | पोस्टाच्या 'या' 9 योजनांवर मिळते धमाकेदार व्याज, 10 रुपयांपासून देखील सुरू करू शकता गुंतवणूक
x

मराठा आरक्षणासाठी पवारांनी पुढाकार घ्यावा | संभाजीराजेंची शरद पवारांकडे मागणी

Maratha reservation

मुंबई, २७ मे | मराठा आरक्षणाच्या मुद्यावर खासदार संभाजीराजे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. मराठा समाज अस्वस्थ आहे, त्यांना न्याय द्यावा, आरक्षण देण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा; अशी मागणी संभाजीराजेंनी पवारांकडे केली.

मराठा आरक्षण रद्द झाल्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे. खासदार संभाजीराजे मराठा समाजाच्या भावना जाणून घेण्यासाठी महाराष्ट्राचा दौरा केला. ठरल्याप्रमाणे आज संभाजीराजे यांनी सकाळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्वर ओक या निवास्थानी जाऊन भेट घेतली.

या भेटीत संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका मांडली. मराठा समाजाचे आरक्षण सुप्रीम कोर्टात रद्द झाले आहे. त्यामुळे समाज हा अस्वस्थ आहे. सध्या परिस्थिती बिकट आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावला पाहिजे. मराठा आरक्षणासाठी आपण पुढाकार घ्यावा, अशी मागणी संभाजीराजेंनी केली.

दरम्यान, खासदार छत्रपती संभाजीराजे भाेसले १८ व १९ मे राेजी नाशिक दाैऱ्यावर येऊन गेल्यानंतर पाठाेपाठ अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील हेदेखील मंगळवारी (दि. २५) नाशिक दाैऱ्यावर येऊन गेले. त्यानंतर पुन्हा संभाजीराजेंनी नाशिकमध्ये तळ ठाेकून विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या गुप्त बैठका घेत चर्चा केली. अाज गुरुवारी (दि. २७) ते अारक्षणासंदर्भात मराठा क्रांती माेर्चाच्या अांदाेलनाची भूमिका स्पष्ट करणार अाहेत. मराठा आरक्षणाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर छत्रपती संभाजीराजे यांनी शांतता व संयम राखण्याचे आवाहन मराठा समाजाला केले होते.

 

News English Summary: On the issue of Maratha reservation, MP Sambhaji Raje met NCP President Sharad Pawar. Maratha society is uneasy, we should give them justice, we should take initiative to give reservation; Sambhaji Raje made such a demand to Pawar.

News English Title: Sambhajiraje Chhatrapati meet Sharad Pawar over Maratha reservation issue news updates.

हॅशटॅग्स

#Maratha Kranti Morcha(221)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x